
दैनिक चालू वार्ता शिरूर प्रतिनिधी-इंद्रभान ओव्हाळ
शिरू (पुणे)
स्व.गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच व रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्था आयोजित
स्व.गणेश गौतम घावटे पाटील यांच्या ३६ व्या जयंती निमित्त
कोण आहे रामलिंग चा प्रज्ञावंत ? स्पर्धा २०२५ घेण्यात आली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामलिंग येथे स्व.गणेश गौतम घावटे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेला सुरवात करण्यात आली.
ग्रामीण भागातील विद्यार्थी ही खूप हुशार असतात,त्यांचा मध्ये असणारी हुशारी,आत्मविश्वास यांना वाव मिळावा ,स्वतःचे गुण ओळखता यावे ,विद्यार्थांना इतर नॉलेज किती आहे हे पाहण्यासाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.सर्वांनी छान उत्तरे लिहून,छान मार्क्स मिळवले.
या परीक्षेचे 3 नंबर काढण्यात आले.
यामध्ये प्रथम क्रमांक रुद्र माने याला रामलिंग चा प्रज्ञावंत घोषित करून मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी , शाल,पुस्तक, भेटा बांधून सन्मानित करण्यात आले. दुसरा नंबर – साई गोरड, तिसरा नंबर – हर्षदा लोंढे यांना ही ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धा परीक्षा साठी शाळेचा मुख्याध्यापिका सुनिता जगताप,शिक्षक अनिल जगदाळे , दादाभाऊ वाघमारे ,जयश्री मांजरे , नीता वाबळे,टोणगे मॅडम,जाधव मॅडम, इतर सर्व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले.
तसेच यावेळी वृक्षारोपण केले.प्रत्येकाने एक तरी झाड लावून ते वाढवले पाहिजे.
यावेळी उपसरपंच – यशवंत कर्डिले,स्वाती थोरात मॅडम,पोटे सर ,उमेश घावटे,ओम कर्डिले,निकिता देव्हाडे उपस्थित होते.
रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने सर्वांचे आभार – राणीताई कर्डिले यांनी मानले.