
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावांच्या भीमजयंती मंडळाच्या अध्यक्षांची आणि पोलिस पाटलांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रामनवमीच्या अनुषंगाने शांतता समिती बैठक २ एप्रिल रोजी सायंकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
यावेळी त्यांनी सांगितले की , अखंड हिंदुत्वाचे आराध्य दैवत श्रीराम नवमी हा धार्मिक उत्सव, भगवान महावीर जन्म , मनुमान जन्मोत्सव , व १४ एप्रिल पासून महामानव , भातीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती,गुड फ्रायडे ,जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती असल्यामुळे सर्व गावातील बंधुभाव आणि समता अबाधित राहावी कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या उद्देशाने आपण शांतता समितीची बैठक घेत आहोत असे यावेळी
म्हणाले की, या वर्षीची भीम जयंती गावोगावी डीजे मुक्त करण्याचा प्रयत्न करावा यासाठी सर्व भीम जयंती मंडळाच्या कार्यकारिणीनी सहकार्य करावे. यावेळी यावर पदाधिकाऱ्यांनी डीजेचा आवाज हा कमी डेसिबल पर्यंत राहील, याची काळजी घेण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. तसेच गावामध्ये सामाजिक सलोखा आणि बंधुभाव राहील या संदर्भाने मार्गदर्शन केले. यावेळी शांतता कमिटीच्या बैठकीत गोपनीय शाखेचे रमेश वाघमारे, पोलीस पाटील संघटनेचे
अध्यक्ष किशोर पांचाळ, जवळा (दे.) पोलीस पाटील, नितीन गवळी यांच्यासह सर्व पोलीस पाटील तसेच भिमजयंती मंडळाचे अध्यक्ष व कार्यकारिणीचे प्रतिनिधी तसेच यामध्ये लोहा पंचायत समितीचे माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, बाळासाहेब खिल्लारे, आकाशवाणी प्रासंगिक निवेदक तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संरक्षण सचिव आनंद गोडबोले, गोडबोले, गजानन गच्चे यांच्यासह जयंती मंडळाचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,पोलीस पाटील ,तंटामुक्त अध्यक्ष सर्वच पदाधिकारी,पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.