
चौकशीसाठी चार सदस्यीय समितीची स्थापना…
भाजपचे विधान परिषद आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नीचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आडमुठेपणामुळे तनिषा भिसे यांना प्राण गमवावे लागल्याचा आरोप होत आहे.
तनिषा यांनी सातव्या महिन्यात जुळ्या मुलींना जन्म देऊन जगाचा निरोप घेतला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जो प्रकार घडला आहे त्याबाबतीत चौकशी केली जाणार आहे. आरोग्य उपसंचालक राधाकिसन पवार यांनी या प्रकरणात चार सदस्य समिती नियुक्ती करण्यात आली. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी दिल्या आरोग्य उपसंचालकांना याबाबत सूचना दिल्या आहेत. तर अल्पसंख्याक आणि वैद्यकीय शिक्षण राज्य मंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी आता प्रत्येक रुग्णालयात आरोग्यदूतची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती दिली आहे.
प्रत्येक रुग्णालयात आरोग्यदूत नेमणार
माधुरी मिसाळ यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलंय की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जो प्रकार घडला आहे, त्याबाबत चौकशी केली जाणार आहे. आता प्रत्येक रुग्णालयात आरोग्य दूतची नेमणूक केली जाणार आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गत असणारा आरोग्यदूत रुग्णालयाच्या कामकाजावर लक्ष ठेवणार आहे. धर्मादाय रुग्णालयात सेवा मिळत नाही, त्यामुळे धर्मदाय समिती अंतर्गत रुग्णालयात आरोग्य दूत नेमणार आहे. धर्मदाय आयुक्त कार्यालयांतर्गत समिती असते, ती याबाबत देखरेख ठेवेल, असे त्यांनी म्हटले.
दीनानाथ हॉस्पिटलच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समितीची स्थापना
तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणी आरोग्य उपसंचालक राधाकिसन पवार यांनी चार सदस्य समिती नियुक्ती केली आहे. दीनानाथ हॉस्पिटलची चार सदस्य समिती चौकशी करणार आहे. यामध्ये एक स्त्री रोग तज्ञांचाही समावेश करण्यात आला आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य उपसंचालकांना समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. समिती आज दिनानाथ हॉस्पिटलची पाहणी करणार असून राधाकिसन पवार यांच्या अहवालावरून दीनानाथ हॉस्पिटलवर कारवाई केली जाणार आहे. आता दिनानाथ हॉस्पिटलवर नेमकी काय कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.