
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी वाशिम रिसोड -भागवत घुगे
रिसोड / जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर यांच्या पुढाकारात महसुल,कृषी विभागाद्वारे रोहयो अंतर्गत ‘जलतारा योजनेला’ प्रारंभ झालेला आहे.ही योजना अधिकाधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वच स्तरातून पुढाकार घेतल्या जात आसतांनी ‘समता फाऊंडेशन ‘या संस्थेने तालुक्यातील तीन गावांतील जलतारा योजनेचे खड्डे खोदुण देण्यासाठी पुढाकार घेतल्याने तालुक्यातील शेतकरी बांधव सुखावला आहे.
समता फाउंडेशनच्या सहकार्याने दिनांक ४ एप्रिल रोजी मांडवा येथे या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मांडवा येथील सरपंच सौ दुर्गा गरकळ तर प्रमुख पाहुणे म्हणून रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, समता फाउंडेशनच्या कोर कमिटीचे सदस्य उत्तमचंदजी बगडिया, संजय उकळकर, संतोष वाघमारे, जावळे साहेब, वसू साहेब बद्रीनारायण कायदे उपस्थित होते.
समता फौंडेशन्स अशा शेतकऱ्यांना मदत करणारे आहेत जे या योजनेच्या अनुदानासाठी पात्र नाहीत. तसेच तालुक्यातील ज्या गावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे अशा गावांना प्राधान्य देणार आहे व त्या गावातील सर्वच शेतकऱ्यांना जलताराचे मोफत गड्डे खोदून देणार आहे.
समता फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून सतत रिसोड तालुक्यातील हिताचे निर्णय घेतले जातात.या आधी सुध्दा शासणाच्या स्वच्छ भारत अभियान प्रभावी पणे राबित रिसोड नगरपरिषद चे नाव विभागीय स्तरावर सन्मानित केले आहे.त्याच प्रमाणे शहरातील हजारो रोपट्याचे वितरण करीत प्रत्येक वृक्षाची जबाबदारी संबंधित व्यक्तीवर जबाबदारी देत शहरातील हजारो वृक्षाचे यशस्वी जतन करण्यात आले,त्याच प्रमाणे शैक्षणिक,आरोग्य,क्रिडा आशा विविध बाबीमध्ये समता फाऊंडेशन चे योगदान राहीलेले आहे.तालुक्यातील जलतारा योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी आता समता फाऊंडेशन ने पुढाकार घेत तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वात घोटा,मांडवा,कु-हा येथे जलतारा चे खड्डे शेतक-यांना मोफत खोदुन देण्यासाठी पुढाकार घेतला आसुन याला संबंधित गावातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,सदस्य,मंडळाधिकारी,तलाठी, ग्रामसेवक,शैक्षणिक संस्था,सेवासहकारी संस्था,शेतकरी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.