
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
देहूरोड :
गुरू गोविंद सिंगसभा देहूरोड यांच्या वतीने ,३२६ व्या शीख स्थापना दिना निमित्त रविवार ( ता.६ ) एप्रिल रोजी नगर किर्तन व भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नगर किर्तन व भव्य दुचाकी रॅलीस देहूरोड येथील गुरुद्वारा पासून सायंकाळी ४: ३० वाजता आयोजन करण्यात आले आहे.नगर कीर्तन सायंकाळी ५ वाजता सुरू होऊन रात्री ८ वाजता देहूरोड येथील गुरुद्वारापासी आगमन होऊन तिथेच सांगता हिणार आहे.
नगर कीर्तन सुरुवात गुरुद्वारा साहिब पासून होऊन बॉबी दा ढाबा ,संतोष स्वीट ,सवाना गार्डन ,वृंदावन चौक मार्गे महात्मा फुले भाजी मंडई ,सुभाष चौक मार्गे देहूरोड गुरुद्वारा साहिब येथे येईल आणि समाप्ती होणार आहे.त्यानंतर भव्य गुरू का लंगर ,महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यात सर्व भाविक ,नागरिक यांनी सहभागी व्हावे ,असे गुरुद्वारा कमिटीचे अध्यक्ष गुरमितसिंग रत्तु,सचिव गुरमितसिंग राजू ,उपाध्यक्ष परमजितसिंग चटवाल ,महेंद्रसिंग सहोथा ,मिकी कोचर ,इंद्रपालसिंग रत्तु यांनी केले आहे.