
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार स्थानिक मराठी भाषेत बँकानी व्यवहार केले पाहिजे परिपत्रकात दिलेल्या नियमनांची अंमलबजावणी न करणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया,कोटक महिंद्रा ,एच डी एफ सी,आय सी आय सी आय ,युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना वडगावशेरी मतदार संघातील शिष्टमंडळाने निवेदन दिले .तसेच मराठी व्याकरणाचे पुस्तक भेट दिले.तसेच अधिकाऱ्यांशी संवाद साधला.या शिष्टमंडळात उपशहराध्यक्ष हेमंत बत्ते,शहर सचिव रमेश जाधव,विभाग अध्यक्ष सुनिल कदम,विभाग सचिव श्रीनिवास दिसले,उपविभाग अध्यक्ष मनोज ठोकळ,अखिल जाधव,राम जाधव,जेमा चव्हाण,सचिन सदभैया,गणेश पाटील कृष्णा मोहिते, बाळासाहेब शिंगाडे संतोष माने ,चेतन मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रिझर्व बँकेच्या परिपत्रकात बँकेचे व्यवहार स्थानिक भाषेत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही अनेक बँकेत त्यांची अंबलबजावणी होताना दिसत नाही. बॅंकेतले सगळे सूचना फलक हे इंग्रजी, हिंदीबरोबरच स्थानिक मराठी भाषेत लावायला हवेत. ग्राहकांशी मराठीत संवाद साधला पाहिजे.माहिती पत्रक ,विविध अर्ज,पैसे भरण्याचा काढण्याचा अर्ज,धनादेश ,खातेपुस्तक हे सगळे व्यवहार इंग्रजी,हिंदीबरोबर मराठी भाषेत असावे .भ्रमणध्वनीवर मराठीत संदेश दिला पाहिजे या मागणीचा निवेदनात उल्लेख केला आहे.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. तरी कित्येक ठिकाणी मराठी भाषेचा आणि मराठी माणसांचा अपमान होत असलेल्या घटना समोर येत आहेत.