
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
देहूगाव.. येथील मुख्य मंदिरात देहू देवस्थान संस्थान च्या वतीने श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली.*आम्हासाठी अवतार ।मस्यकुर्मादी सुकर । मोहें धाव घाली पान्हा । नाव घेता पांढरीराणा।*
श्रीरामनवमी उत्सवा निमित्त देहूतील मुख्य मंदिरात सकाळी १० ते १२ या वेळेत रामदास महाराज मोरे यांचे कीर्तन झाले.त्यानंतर बरोबर बारा वाजता प्रभू श्रीराम जन्म होताच उपस्थित भाविक भक्तांनी आपल्या हातातील फुलांचा वर्षाव केला.देहू देवस्थान संस्थानचे नवनिर्वाचित अध्यक्ष विश्वस्त यांच्या हस्ते ,श्रीराम प्रभू यांच्या मूर्तीस महाभिषेक करून महापूजा करण्यात आली.नंतर सुटवड्याचा प्रसाद दाखवण्यात आला.त्यानंतर संत तुकाराम महाराज आरती करून उपस्थित भाविक भक्तांना सुंटवड्याचा प्रसाद वाटप करण्यात आला.रविवार असल्याने आणि श्रीरामनवमी असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी केली होती.रामनवमी निमित्त श्रीराम मंदिरात व इतर ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
*विश्वहिंदू परिषद व बजरंगदल यांच्या वतीने भव्य शोभायात्रा*
श्रीरामचंद्र जन्मोउत्सावा निमित्त विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दल देहूरोड प्रखंड यांच्या वतीने देहूरोड पंचक्रोशी ,तसेच देहूगाव येथे देहूगाव व पंचक्रोशी आणि तळवडे येथे तळवडे पंचक्रोशी हिंदू समाज एकत्र येऊन भव्य शोभा यात्रा काडण्यात आली.सकाळी ९ वाजता श्रीरामांचा अभिषेक ,सकाळी १० वाजता सामाजिक समरसता यज्ञ , आणि सकाळी १२ वाजता महाआरती व प्रसाद श्रीराम मंदिर शीतळानगर मंदिर या ठिकाणी.
सायंकाळी पाच वाजता श्रीराम नवमी शोभा यात्रेस प्रारंभ करण्यात आला.प्रभूरामचंद्र मूर्ती ,धर्मवीर छ. संभाजी रथ , आणि तसेच राष्ट्रीय पुरुष ,राष्ट्रीय माता यांचा सामाजिक समरसता रथ हे शोभायात्रा कडण्यात आली.देहूगाव मध्येही याच प्रकारे भव्य शोभायात्रा काडण्यात आली.या मध्ये देहूगाव येथील मुख्य प्रवेशद्वारा मध्ये भव्य असा जल्लोष करण्यात आला.
देहूरोड येथे श्रीरामनवमी निमित्त सायंकाळी ६ वाजता भव्य दिव्य अशी शोभा यात्रा काडण्यात आली. छत्रपती श्री शिवाजी विध्यालया पासून या शोभा यात्रेस प्रारंभं करण्यात आला.रात्री ९ ते १२ धर्मसभा व महाप्रसाद देण्यात आला.त्यानंतर ही शोभा यात्रा एम बी कॅम्प शाळा मैदानावर आल्यानंतर या शोभा यात्रेची सांगता करण्यात आली. या निमित्त छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच व्याख्यान झाले.अशा प्रकारे देहूगाव व पंचक्रोशी श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.