
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी
सध्या देगलूर आत सोशल
मीडियावर सतत नवनवे ट्रेंड येत असतात. मग त्याचे अनुकरण सर्वसामान्यांकडून स्वाभाविकपणे केले जाते. सध्या देगलूर शहरात व तालुक्यात सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेला नवा ट्रेंड म्हणजे ‘घिबली’. नेते-मंत्री, आमदार कार्यकर्तही सध्या या ट्रेंडच्या प्रेमात पडलेले आहेत. कार्टून फोटो म्हणजेच ‘घिबली.’ एआयच्या माध्यमातून फोटो तयार करून सोशल माध्यमांवर टाकण्याची फॅशनच सध्या आलेली दिसते आहे. पण सोशल मीडियातील ट्रेंड सतत बदलता राहत असल्याने हा ट्रेंड किती दिवस कायम राहणार? असा प्रश्न चर्चिला जात आहे.
आकर्षक व लोभसवाण्या फोटोंची भुरळ सध्या भल्याभल्यांना पडलेली दिसते. कॉलेज तरुणां बरोबरच नोकरवर्ग व मोठमाठे व्यावसायिक आणि राजकीय नेते देखील आपले कुटुंबासोबतचे, फिरायला गेलेले, बड्या व्यक्तींसोबतचे फोटोंचे कार्टून (घिबली) बनवून समाज माध्यमांवर पोस्टकरताना दिसत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर आणि अनेकांच्या स्टेटस स्टोरीला वेगळीच चित्रे पाहायला मिळू लागली आहेत. इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर यांसह अन्य सोशल मीडियावर सध्या हा घिबली ट्रेंड जोरदार व्हायरल होत आहे.प्रत्येक जण या ट्रेंडचा वापर करून आपल्याकडील संग्रहित छायाचित्रांची कार्टून बनवून सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत आणि त्याला नेटकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अशा फोटोंवर असंख्य लाइक आणि कमेंट्सचा पाऊस
पडतो आहे.
इतकेच नव्हे, तर अनेक कार्यकर्ते आपल्या पक्षाच्या वरिष्ठांसोबत काढलेले छायाचित्रे आणि कुटुंबांसह सोबत काढलेले छायाचित्रे देखील कार्टून बनवून व्हायरल करताना दिसत आहेत. तरुणाई बरोबरच ज्येष्ठांनाही घिबलीने भुरळ घातली आहे. अनेक ज्येष्ठांनीही आपले कार्टून छायाचित्र बनवून सोशल मीडियावर व्हायरल केले दिसते. त्यासोबतच काही प्रसिद्ध परदेशी उद्योजकांनीसुद्धा आपले छायाचित्र घिबली करून म्हणजेच कार्टून बनवून सोशल मीडियावर व्हायरल केले आहे
घिबली’ फोटो मिक्स
‘घिबली’ छायाचित्र ‘चॅट जीपिटी’ या ‘एआय'(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) अॅपच्या माध्यमातून बनवले जात आहे. सबस्क्रीप्शन नसतानाही असे फोटो बनवता येत आहेत. मात्र, काहींना याचे सबस्क्रीप्शन घ्यावे लागत आहे. तसेच असे फोटो बनवण्यासाठी अनेक ‘एआय टुल्स’ उपलब्ध आहेत. त्याचा वापर नेटकरी करत आहेत.
घिबली राँग ट्रेंड’ अशाही चर्चा
सध्या सोशल मीडियावर स्टुडिओ घिबली स्टाइलमधील एआय जनरेटेड फोटांचा ट्रेंड जोरात सुरू आहे. युजर्स त्यांचे फोटो अपलोड करून ओपन एआयच्या माध्यमातून चॅटजीपीटी किवा एक्सएआयच्या ग्रॉक ३ सारख्या एआय टूल्सद्वारे ‘घिबली’ स्टाइलमध्ये फोटो बनवत आहे. आपले हवे ते फोटो ‘घिबलीत’ रूपांतर होताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कॉपीराईटचे कारण दाखवून अनेकांचे फोटो जनरेट होत नाहीत. आणि जर फोटो ‘घिबली’ स्वरूपात जनरेट झालेच तर ते चुकीचे, हास्यास्पद आणि काहीवेळा वेगळेच फोटो तयार होत आहेत. त्यामुळे चुकीचे फोटो मिळत असल्याच्या तक्रारी युजर्स करत आहे.