दैनिक चालू वार्ता वर्धा – उपसंपादक -अवधूत शेंद्रे
—————————————-
वर्धा – आष्टी :- वर्धा जिल्हा परिषद लघु सिंचन विभाग हा आर्वी येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी विनीत साबळे यांच्या अटेलट्टू धोरणामुळे चांगलाच गाजत आहे नुकताच धाडी येथील पाझर तलाव बांधकाम करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅनेज करून वर्धेचा शर्मा नामक ठेकेदार आणून बसवला आहे त्यामुळे त्यांचेवर बांधकाम कामात भागीदारी असल्याचा आरोप होतो आहे त्या बोगस कामाची तक्रार केली असता शंभर टक्के आमचा कॉन्ट्रॅक्टर चांगला आणि काम चांगले आहे म्हणून तक्रारदारासमक्ष जलसंधारण अधिकारी अंदाजपत्रक न दाखवता कुणीही तक्रार केली असता मुजोरी करतो आहे असे अनुभव काल-परवा एका कार्यकर्त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधी जवळ विशद केला त्यामुळे सध्या तरी जिल्हा प्रशासनात लघु सिंचन विभाग बोगस पद्धतीत प्रसिद्धीच्या शिखरावर आहे त्या अनुषंगाने प्रस्तुत प्रतिनिधी जवळ लघु सिंचन विभागाच्या तक्रारी प्राप्त होत आहे त्यानुसार लघु सिंचन विभागाची नियमबाह्य कामे उघडकीस येऊ लागली आहे त्यात असे की, जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाचा कार्यकारी अभियंता पदभार वर्धा येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी हिरामण लाडसे यांच्याकडे आहे त्यांनी आपल्या पदाला न्याय देणे अपेक्षित असताना कार्यालयातील आरेखक विनोद बोर्डे यांना जलसंधारण अधिकाऱ्याचा पदभार १ वर्षापासून देऊन टाकला आहे खरे पाहता नियमानुसार आरेखक पद अभियंता श्रेणीत येतच नाही तरी सुद्धा आरेखक पदावरील व्यक्तीला जलसंधारण अधिकारी पदभार सोपवला आहे त्यामुळे प्रभारी कार्यकारी अभियंता लाडसे यांचा सदर पदभार सोपवण्याचा छुपा अजेंडा कोणता ? असा प्रश्न उपस्थित होत आहे प्रभारी कार्यकारी अभियंता हिरामण लाडसे हे आरेखक पदावरील व्यक्तीला जलसंधारण अधिकाऱ्याचा पदभार देऊन कोणत्या प्रकारचे अभियान राबवत आहे अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी लक्ष देण्याची गरज आहे एवढे मात्र खरे