
दैनिक चालु वार्ता वर्धा – उपसंपादक – अवधूत शेंद्रे
—————————————-
वर्धा – आष्टी :- आष्टी वनपरीक्षेत्रातील सहवनक्षेत्र पिलापूर येथील नियतक्षेत्र अंतोरा मौजा जुना अंतोरा मधील शेतकरी झिंगरोजी तुकाराम तायवाडे, राहणार अंतोरा यांच्याकडील शेत सर्वे क्रमांक १७/१ मध्ये नर जातीचा बिबट मृत अवस्थेत दिसून आला सदर घटनेची माहिती मिळताच वर्धा वनविभाग, सहाय्यक वनसंरक्षक डी.एम.कोकरे,आष्टी वनपरिक्षेत्र अधिकारी,वाय .एस. उईके, तळेगाव(शा.पंत)वनपरिक्षेत्र अधिकारी विजय सूर्यवंशी ,क्षेत्र सहाय्यक साहूर, पिलापूर माणिकवाडा या कार्यालयातील वन कर्मचारी हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांचे चमूने घटनास्थळी पोहोचून राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) चे मार्गदर्शन सूचनाचे पालन करीत मृत बिबटचे शवविच्छेदन केले. मृत बिबटचे शरीराचे सर्व अवयव साबूत असल्याचे निदर्शनास आले असून शरीराचे विघटन झाल्याचे दिसून आले. शवविच्छेदना दरम्यान मृत बिबटचे मृत्यूचे कारण वैज्ञानिक दृष्ट्या स्पष्ट होण्यासाठी अवयवाचे नमुने फॉरेन्सिक लॅबोरेटरीला पाठवण्याकरिता पाठवण्यात आले आहे. शवविच्छेदना नंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणचे (एनटीसीए) मार्गदर्शन सूचनानुसार मृत शरीराची विल्हेवाट लावण्यात आली. मृत बिबटच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदनातूनही प्रथमदर्शनी स्पष्ट झालेले नाही. सदर प्रकरणी वनविभाग मार्फत शोध मोहीम सुरू असून पुढील तपास वर्धा उपवनसंरक्षक हरवीरसिंग यांचे मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक डी.एम. कोकरे, आष्टी वनपरिक्षेत्र अधिकारी वाय. एस. उईके, तळेगाव वनपरिक्षेत्र विजय सूर्यवंशी अधिकारी व क्षेत्रसहाय्यक, पिलापूर,साहूर व माणिकवाडा तसेच वन कर्मचारी करीत आहे असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे