दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
आठवात रोज तुझ्या
सखे मी बहरुन जातो
पाहण्यास रोज तुला
नयनास मोह होतो…
तुझ्या प्रेमाच्या विरहाचा
काळजावर घाव होतो
असेल सारे असाह्य तरी
मनाचा मनासी तह होतो….
तुझ्या रांगड्या स्पर्षाने
अंतरी भावनांची दाह होते
थंड वाऱ्यांच्या सवे बघ
रात गर्द होत जाते….
✍️ भागी ✍️
भास्कर अर्जूनराव गिते
कंधारकर
९८६०८६३६८४