
दैनिक चालु वार्ता भुम प्रतिनीधी –
भूम
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प भूम अंतर्गत पोषण जागर उपक्रम घेण्यात आला. यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करत दीप प्रज्वलन सरपंच सुशीलाताई पाटिल,अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती इंगळे, माजी सरपंच प्रशांत मुंडेकर, मुख्याध्यापक बाळासाहेब भगत व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजकिरण गोयकर यांच्या हस्ते करण्यात आले.
मुलांच्या शारीरिक, मानसिक विकासामध्ये पोषण आहार अत्यंत महत्वाचा असतो. या पार्श्वभूमीवर भूम तालुक्यातील आरसोली गावामध्ये अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण जागर उपक्रम महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत दि ११ रोजी साधत केला .
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प भूम २०२४-२५ अंतर्गत हा उपक्रम घेऊन पालकांमध्ये बालकांच्या आहाराबाबत जनजागृती करण्यात आली.
यावेळी शिक्षिका कल्पना घेवारे, शारजा सुरवसे, कविता नागटिळक, मिना नागटिळक, विद्या वाघमारे, भाग्यश्री पाटुळे, पूजा जाधव, मंगल माळी, संगीता भगत, रतन जाधव, विमल शेटे, मनिषा बोटे, सविता सुतार व अंगनवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी मनीषा मोराळे यांनी केले.