
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
नांदेड देगलूर :
छत्रपती संभाजी नगर येथे कार्यरत असणारे चालक मष्णा संग्राम कांबळे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे राहते गाव मरतोळी तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथे 11-04-2025 रोजी दुःखद निधन झाले रा.प.सेवेत काम करीत असताना संसाराचा गाडा चालवत असताना महामंडळाच्या ६५ टक्के पगारीचा महाराष्ट्रातील पहिला बळी मष्णा संग्राम कांबळे ठरलेला दिसून येत आहे रात्रंदिवस राप महामंडळाची सेवा करीत असताना महिनाभर काम करून सुद्धा आपल्या हक्काचा पगार आपणास न मिळत असल्याबाबत ते तनवाखाली होते व त्यामध्येही राज्य परिवहन महामंडळाने मार्च पॅड इन एप्रिल च्या पगारीमध्ये राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना ६५ टक्के पगार देण्यात आले संसाराच्या गाडा चालत असताना ६५ टक्के पगारवाढीमध्ये त्यांचा उदरनिर्वाह होत नसल्यामुळे आर्थिक दडपणाखाली असल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन मरतोळी येथे त्यांच्या राहत्या घरी झाले त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा मुलगी जावई नातवंड असा मोठा परिवार आहे.