
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल पासून साजरी होत आल्यामुळे सर्व गावातील बंधुभाव आणि शांतता अबाधीत रहावी व कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या उद्देशाने आपण शांतता समितीची बैठक घेत आहोत , या वर्षीची भिमजयंती निमित्त गावोगावी डीजे मुक्त व शांतता पूर्ण वातावरणात साजरी करण्यात यावी, अशा सूचना उस्माननगर पोलीस ठाणे येथील शांतता समितीच्या बैठकीत कंधार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप यांनी दि.९ एप्रिल २०२५ रोज बुधवार ह्या दिवशी सुचना केल्या आहेत .
उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पवार यांची नुकतीच छत्रपती संभाजीनगर ग्रामीण
विभागात बदली झाल्यानंतर या ठिकाणी नांदेड इतवारा पोलीस ठाण्यातून उस्माननगर पोलीस ठाण्याला बदली झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून महेश मुळीक हे नुकतेच रुजू झाले. त्यांचे गावक-यांच्यावतीने ,पोलीसपाटील, भिमजयंतीचे पदाधिकारी यांच्या कडून शाल,पुष्पहार देवून यथोचित सत्कार करण्यात आला. यानंतर सपोनी महेश मुळीक म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या व विविध सण उत्सवांच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उस्माननगर पोलीस ठाण्या अंतर्गत गावातील सर्व पोलीस पाटलांची व जयंती
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत डीजे मुक्त व शांततापूर्वक वातावरणात जयंती साजरी करावी तसेच विविध सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याच्या सुचना या बैठकीत करण्यात आले आहे. यावेळी बैठकीत पोलीस कर्मचाऱ्यांसह सर्व गावातील पोलीस पाटील व जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.