
दैनिक चालु वार्ता पाटोदा (प्रतिनिधी) : सुनिल तांदळे
पाटोदा (बीड) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता पाटोदा शहर व पोस्ट हद्दीतील शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, सदस्य, तसेच परिसरातील विविध प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी जयंती उत्सव शांततेत, सुसंघटीत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा व्हावा यासाठी महत्त्वाच्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीत खालील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली मिरवणुकीचा मार्ग, वेळ आणि शिस्तबद्ध आयोजन पोलीस बंदोबस्ताची तयारी व सुरक्षा यंत्रणा ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करण्याचे आवाहन तसेच जातीय सलोखा व सामाजीक ऐक्य जपण्यावर भर स्वच्छता, पाणी व्यवस्था व सार्वजनिक ठिकाणांची योग्य देखभाल या विषयावर चर्चा झाली या बैठकीस पोलीस निरीक्षक तसेच सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.