
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा दवणे
जालना मंठा
शहरा लगत असलेल्या गेवराई रोडच्या अनधिकृत विटभट्ट्या गेवराई ग्रामस्था तर्फे हटवण्याची मागणी केली आहे कारण की सकाळी भ्रमण करण्यासाठी दमा आजाराचे रुग्ण, बीपी, शुगर, हृदयविकार यासह कसरत करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांस वीट भट्टी मधून निघणाऱ्या धुराचा पहाटेच सामना करावा लागतो. यात (दि ११) रोजी मंठा गेवराई
गेवराई येथून शाळेत परीक्षेत करिता जाणाऱ्या दोन मुलीला कच्चा विटा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने धडक दिली थोडक्यात मुली बचावल्या. मद्यधुंदीमध्ये ट्रॅक्टर चालवत चालक, मंठा ते गेवराई रोडवर वीट भट्टीचे वाढते अतिक्रमण यामुळे रहदारी करताना जीव मोठे घेऊन वापरावे लागत आहे.पाच विटभट्टी चालक भट्ट्या मात्र दोन अंकात याबाबत म्हणतात तहसीलदार यांना निवेदन देऊन गेवराई येथील ग्रामस्थांनी अनधिकृत विटभट्ट्या तात्काळ हटवण्याची मागणी मंठा तहसीलदार यांना निवेदन देऊन केली अपघात झाल्यास यास जबाबदार कोण असा प्रश्न गेवराई ग्रामस्थांच्या वतीने केला जात आहे.
गेवराई गावच्या शिवारात अगदी हाकेच्या अंतरावर या वीट भट्टी अनेक दिवसापासून चालू आहेत. भट्टी धारकांनी समतेपेक्षा जास्त क्षेत्र व्यापून रहदारी करणाऱ्या नागरिकास, सायकल, मोटर सायकल, अवजड वाहन ये जा करताना घेऊन प्रवास करावा लागत आहे.
रात्रंदिवस निघणाऱ्या वीटभट्टीच्या धुरामुळे अनेकांना श्वसनाच्या आजाराचा सामना करावा लागत असून अनेकांचे उपचार जालना येथे आहेत. धूर, दुर्गंधी आणि जवळच असलेल्या शेती यामुळे नापीक होत असून याबाबत गेवराई ग्रामस्थांनी गावचे पुनर्वसन करा किंवा सदरील अनधिकृत चालू असलेल्या वीटभट्टी या तात्काळ गावापासून दूर अंतरावर हलवा अशी विनंती निवेदन देऊन तहसीलदार मंठा यांना केली आहे. नसता लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.