
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. त्याअंतर्गत पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील,, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ चे हिंमत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे तत्कालीन वरिष्ठ पो. निरीक्षक पंडित रेजितवाड व वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली युवराज हांडे यांच्या आदेशानुसार, वाघोली पोलीस ठाणे अभिलेखवरील एन डी पी एस ( गांजा ) गुन्ह्यातील रेकॉर्ड वरील आरोपी महिला छकुली राहुल सुकळे ( वय २४ रा. वाघेश्वरनगर गायरान वाघोली, ता. हवेली, जि. पुणे ) हिला पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे एक वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक वैजिनाथ केदार, पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे, पो. ह. प्रशांत कर्णवर, प्रदीप मोटे, पो अंमलदार सागर कडू, कमलेश शिंदे, महादेव कुंभार, अमोल गायकवाड, साई रोकडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दीपक कोकरे, प्रितम वाघ, समीर भोरडे, मंगेश जाधव वाघोली पोलीस स्टेशन यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.
वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडगिरीस आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने उचललेले हे कठोर पाऊल भविष्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.