
दैनिक चालु वार्ता कोल्हापूर चंदगड प्रतिनीधी -संदिप कांबळे
चंदगड/ प्रतिनिधी: दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी मराठी विद्या मंदिर कोदाळी या शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी शाळा मुख्याध्यापिका श्रीम. सुनिता वाजंत्री मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. संतोष दळवी, शिक्षण तज्ञ श्री. संदीप कांबळे, सदस्य श्री. श्रीपत कांबळे व शिक्षक उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. त्या नंतर विध्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती सांगितली. तसेच सदस्य श्री. श्रीपत कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक सुरेल गीत सादर केले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष दळवी व अध्यापक श्री. महेश ढोले सर यांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मित चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचे बक्षीस वितरण करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या कडून सर्व विध्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार सौ. सागरिका कुटे मॅडम यांनी मानले.