
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी –
लोहा तालुक्यात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ भिमराव रामजी आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त मोफत जलसेवेचे आयोजन करून जलवाटप करण्यात आले.
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा वसा पुढे नेत, लोहा तालुक्यातील युवासेना तालुकाध्यक्ष नंदू पाटील इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, भीम जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीसाठी येणाऱ्या भीमसैनिकांसाठी पाणपोईचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उद्घाटक पोलिस उपनिरीक्षक पांचाळ यांच्या हस्ते झाले.
यावेळी उपस्थित आंबेडकरवादी चळवळीचे जेष्ठ नेते नगरसेवक बालाजी खिल्लारे ,अनिल गायकवाड,राहुल हंकारे , युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन भैया जारिकोटे , यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आयोजक युवासेना तालुका प्रमुख नंदाजी पाटिल इंगळे, शहरप्रमुख विजय चव्हाण गोविंद पाटील वडजे,सुरज गोविंदराव तेलंगे,रूपेश भैया पवार,भरत पा गायकवाड, देविदास पा मुरंबीकर, प्रताप पाटील वाकडे युवासेना तालुका सचिव) नरेश पाटील घोरबंड सह आदी उपस्थित होते