
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी-
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आदर्श अशी राज्यघटना तयार करून देशाच्या स्वाधीन केली.त्याच आधारावर आपला देश भक्कमपणे उभा असताना वावरताना,या घटनेला छेद देवून देशाला वेगळ्या पद्धतीने घेऊन जाण्याचे ,सर्व मोडीत काढण्याचा प्रकार सध्याच्या शासनात चालू आहे.सद्या देशात लोकशाही धोक्यात आली आहे.लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आपण जागरूक राहिले पाहिजे असे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लातूर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी जुना लोहा शहरातील त्रिरत्न बुद्ध विहार येथील आयोजित जयंती कार्यक्रमात केले.
भारतीय राज्य घटनेने शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व प.पु.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जुना लोहा शहरातील त्रिरत्न बुद्ध विहार येथील आयोजित पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या हस्ते तर निळ्या ध्वजाचे ध्वजारोहन प्रा.मनोहर धोंडे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रथमत: महात्मा गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन मधुकर दिघे व मान्यवरांच्या हस्ते मेणबत्ती पेटवून धुप पुजा, पुष्प पूजा करून अभिवादन करण्यात आले.
प्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लातूर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण, सेवा जनशक्ती पार्टीचे नेते पक्षप्रमुख प्रा मनोहर धोंडे, संचालक भिमराव पाटील शिंदे, आंबेडकरी चळवळीतील कलाल पेठ जुना लोहा शहरातील मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन तथा माजी नगरसेवक उत्तम महाबळे,माजी नगरसेवक चंद्रकांत नळगे, माजी नगरसेवक शिवाजी आंबेकर, माजी नगरसेवक अनिल दाढेल, हानमंत लांडगे,लुटे,घोडके सर,नागनाथ चुडावकर,बी बी गायसमुद्रे,जेष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे,प्रदिप कांबळे,काशिनाथ भारती,बजरंग यादव,गोविंद वड, मारोती कांबळे,विलास सावळे,रेषमाजी दांगटे,मल्लिकार्जुन शेटे, ,आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना लातूर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण म्हणाले की, निवडणूक आयोग, न्याय व्यवस्था, सीबीआय, ईडी यांना हाताशी धरून सत्ता मिळवली या प्रवृत्तीला कुठेतरी थांबवायचे आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जुन्या चालीरिती रूढी परंपरांना छेद देवून अनेक वर्षांपासून खितपत पडलेल्या समाजाला बाहेर आणण्याचे काम काम केले.औरंगजेबाची कबर खोदून काढा म्हणायचं काही कारणच नव्हतं,एका न्यायाधीशाच्या घरात पंधरा कोटीचे घबाड सापडले याला पाठीशी घातलं जातंय.यामुळे न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडत आहे. लोकशाही धोक्यात आली आहे.आपण जातीपातीचा विचार केला तर पुढची पिढी माफ करणार नाही.बाबासाहेबांनी दिलेले लोकशाही चा घटनेचा आदर करून हक्क अधिकार पालन करून करावेत असे म्हणत माजी आमदार रोहिदास चव्हाणांनी तमाम भारतीयांना जयंतीनिमित्त शुभ दिनी शुभेच्छा दिल्या.
भारतीय राज्यघटना व कायद्याचे राज्य टिकवण्यासाठी वचनबद्ध व्हा – प्रा मनोहर धोंडे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय राज्य घटनेचं बहुजनांनी जतन करणे गरजेचे आहे.त्यांनी दाखवलेला मार्ग व दिलेल्या विचारांवर एकजूटीने पुढची पावलं टाकावीत.देशाची संस्कृती, देशाची भारतीय राज्य घटना आणि कायद्याचे राज्य टिकवण्यासाठी वचनबद्ध व्हाव लागेल असे सांगत.विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तमाम भारतीयांना शुभेच्छा देतो.
— प्रा.मनोहर धोंडे
सेवा जनशक्ती पार्टी संस्थापक अध्यक्ष
सदरील त्रिरत्न बुद्ध विहार येथील आयोजित जयंती सोहळा कार्यक्रमासाठी पत्रकार प्रविण महाबळे,सिद्धार्थ महाळे,शरद कापुरे,किर्ती महाषळे,रवी महाबळे,केरबा महाबळे,दिगांबर जोंधळे, जयपाल महाबळे ,उमा पार्वती सेवाभावी संस्था अध्यक्ष पोर्णिमा महाबळे,इंदूताई येवले, छायख महाबळ, सूनबाई महाबळे,अंबुबाई महाबळे आदींनी भरपूर परिश्रम घेतले.