
दैनिक चालु वार्ता जेजुरी प्रतिनिधी : संदिप रोमण
पुरंदर : धार्मिक सामाजिक आणि विधायक कार्यातुन शेकडो वर्षाचा मंदिर संस्कृती निर्मिती जीर्णोद्धार करणारे आणि इतिहासात आपल्या महा पराक्रमाचा ठसा उमटवणारे मराठीचा झेंडा अटकेपार करणारे परम खंडोबा भक्त सरदार मल्हारराव होळकर यांच्या जेजुरी येथील मल्हार गौतमेश्वर स्मृती छत्री मंदिराला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला जावा या मागणी करिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या पुण्यस्मरण शताब्दी सोहळ्या निमित्त मध्यप्रदेश इंदोर, महेश्वर येथून आलेल्या क्षत्रिय धनगर सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी जेजुरीच्या मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिरास नुकतीच भेट देऊन भंडाऱ्याची उधळण करत सदर सुंदर स्मारकस राष्ट्रीय संरक्षित स्मारकचा दर्जा शासनाने द्यावा अशी मागणी इंदोर येथील संजय कड, दीपक वालेकर, पांडुरंग होळकर, अशोक काळे, मयंक भुसारी, मधुकर गोरे, सुबोध तोबे, विकास पारधी, शरद पारखे, बारामतीचे विक्रांत काळे पुण्याचे विठ्ठल कडू ,यांनी केली आहे तर या प्रसंगी श्री मार्तंड देवसंस्थानचे विद्यमान सदस्य डॉ राजेंद्र खेडकर यांनीही पाठींबा दर्शवत शासनाला साकडे घातले आहे.
जेजुरीगडाच्या ऐतिहासिक वास्तू स्थापत्या रचना आणि जीर्णोदर करणारे उत्तम अभियंता शिल्पकार म्हणून श्रीमंत सरदार मल्हारराव आणि त्यांच्या स्नुषा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास आहे. खंडोबा देवावरील परम भक्ती असल्याने जेजुरीगडाच्या पायथ्याशी मल्हार गौतमेश्वर छत्री स्मृती स्मारक इतिहास काळात बांधलेले असून येथे सर्वोत्तम घुमट स्थापत्य रचना वैशिष्टपूर्ण उभारण्यात आली आहे. तत्कालीन आतील गाभरा मल्हारराव होळकर आणि त्यांच्या दोन भार्या यांच्या सुबक मूर्ती आणि देखणे शिवलिंग आजही पाहण्यासाठी मिळते सध्या पुरातत्व विभागाच्या वतीने मंदिराची जीर्णोद्धार करण्यात येत असून येथील विशाल पाषणातील नंदी आकर्षक वाटतो, इंदोरच्या क्षत्रिय धनगर संघ यांचे स्वागत जिजामाता हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या 300 व्या पुण्यस्मरण शताब्धी सोहळ्या निमित्त मध्यप्रदेश इंदोर येथून ते महाराष्ट्र येथील चोऊंडी येथे येत्या 6 ते 7 मे रोजी कर्मभूमीत ते जन्मभूमी आशा भव्य अहिल्या विचार यात्रा परिक्रमाही दाखल होत असल्याचे दीपक वालकर यांनी सांगितले.