
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
नांदेड देगलूर
पत्रकार संरक्षण समितीच्या तालुका सचिवपदी साप्ताहिक देगलूर टाइम्सचे संपादक गजानन शेषेराव टेकाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या संपर्क कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात तालुका अध्यक्ष शेख असलम यांच्या हस्ते टेकाळे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी समितीचे कार्याध्यक्ष धनाजी देशमुख, कोषाध्यक्ष तोहिद काझी, सहसचिव मनोज बिरादार, प्रसिद्धी प्रमुख धनाजी जोशी, तसेच इस्माईल खान, अफान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
गजानन टेकाळे यांच्या नियुक्तीमुळे पत्रकारांच्या हक्कांसाठी लढा अधिक प्रभावीपणे लढला जाईल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
दरम्यान, पत्रकार संरक्षण समितीची देगलूर तालुक्यातील शाखा स्थापन झाल्यापासून अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले असून, पत्रकारांसाठी ही संस्था आधारवड ठरली आहे. तालुक्यात या समितीची वाढती लोकप्रियता आणि कार्यपद्धती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे