
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी
देगलूर तालुक्यातील ९० ग्रामपंचायतीसाठी २५ एप्रिल सकाळी १०:०० वाजता तहसील कार्यालयात सरपंच पदासाठी आरक्षण सोडत होणार आहे. त्यामुळे सरपंच पदाच्या आरक्षणाकडे तालुक्यातील गाव पुढाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
देगलूर तालुक्यात ९० ग्रामपंचायती आहे. गावातील गावपुढाऱ्यांची गावात असलेली पत ठरविण्याची ग्रामपंचायत निवडणूक आहे. त्यामुळे देगलूर तालुक्यातील सुमारे ९० ग्रामपंचायतची २५ एप्रिल रोजी तहसील कार्यालयात सकाळी १०;०० वाजता सरपंच पदासाठी आरक्षण सोडत होणार आहे.
या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे गाव पुढाऱ्यांचे लक्ष लागले असून सर्वांनाच आरक्षणाची उत्सुकता आहे. मागील गेल्या पाच वर्षात गावात केलेल्या कामाची पावती मिळण्यासाठी अनेक गाव पुढारी ग्रामपंचायतच्या निवडणु सामोरे जाते.
परंतु लोकशाहीच्या या सोहळ्यात चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. तर अनेकांना घरचा रस्ता मिळतो. मतदान रुपी जनता जनार्दन मतदान करून आपला लोकप्रतिनिधी निवडतात. परंतु पुढील पाच वर्ष संबंधित लोकप्रतिनिधीच्या कामाचे मूल्यमापन केले जाते. त्यावरूनच गावातील गाव पुढारी सरपंच पदाचा मानकरी ठरतो.
ग्रामीण भागात सरपंच पद प्रतिष्ठेचे –
ग्रामीण भागातील आणि कार्यकर्त्याची निवडणूक म्हणून ग्रामपंचायतच्या निवडणुकीकडे पाहिले जाते. ग्रामीण भागात सरपंच पद हे मानाचा आणि प्रतिष्ठेचे पद मानले जात असल्याने सर्वच राजकीय पक्ष ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्याची नशीब आजमावण्यासाठी तयारी करून घेतात.
जातीनिहाय असे असणार सरपंच –
अनुसूचित जाती प्रवर्ग :
एकूण पद २३ त्यापैकी महिला १२ व पुरुष ११
अनुसूचित जमाती प्रवर्ग : एकूण ५ महिला ३ व पुरुष २
इतर मागास प्रवर्ग प्रवर्ग : एकूण १७ त्यापैकी महिला ९ व पुरुष ८
सर्वसाधारण प्रवर्ग : एकूण ४५ त्यापैकी महिला२३ व पुरुष २२
निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण –
निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण दिलेले आहे.
निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण –
निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण दिलेले आहे. देगलूर तालुक्यातील ९० ग्रामपंचायती पैकी तब्बल ४७ ग्रामपंचायती महिला सरपंच चालवणार आहे.
त्यामुळे अनेक गाव पुढारी काही धोका होऊ नये म्हणून आपल्या पत्नीला राजकारणात आणत आहे. त्यामुळे महिला-पुरुष कोणतही आरक्षण निघाले तरी अनेकांनी तयारी पूर्ण करून ठेवली असल्याची चर्चा देगलूर तालुक्यातील गावागावात रंगत आहे.