
पुण्यातील बोप देव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वालचंद नगर पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतले आहे.
जवळपास सात महिन्यांनतर हा आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे.
ऑक्टोबर 24 मध्ये पुण्यातील बोप देव घाटातील सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील तिसरा आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. सुरज उर्फ बापू गोसावी असे पोलिसांनी अटक कलेल्या या मुख्य आपरोपीचे नाव आहे. वालचंद नगर पोलिसांनी अकलूज मधून याला ताब्यात घेतलं आहे. आरोपी गोसावी हा गेल्या अनेक महिन्यापासून फरार होता. वालचंद नगर पोलिसांनी एका गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी गोसावी याचा लागला पत्ता. आरोपी गोसावी याने बोपदेव घाटात आपल्या मित्रासमवेत फिरायला गेलेल्या तरुणी वरती लैंगिक अत्याचार केला होता.
3 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री पावणे अकरा ते मध्यरात्री दीडच्या दरम्यान बोपदेव घाटातील टेबल पॉइंट येथे ही बलात्कराची घटना घडली होती. आपल्या मित्रासवेत फिरायला गेलेल्या 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. आरोपी सुरज उर्फ बापू गोसावी आणि त्याच्या इतर दोन साथीदारांनी मिळून तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केले होते.
याप्रकरणी पुणे पोलिसांनी चंद्रकुमार कनोजिया आणि शोएब अख्तरला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरज उर्फ बापू गोसावी फरार होता. याला पुणे ग्रामीणच्या वालचंद नगर पोलिसांनी अकलूज मधून ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणाचा अटक केलेले दोन आरोपींची येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्वतंत्र चाचणी ओळख परेड घेण्यात आली. पीडित तरुणी आणि तिच्या मित्राच्या उपस्थितीत दोन दिवस आरोपीची ओळख परेड घेण्यात आली. तिसरा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अत्तर उर्फ बाबू शेख आणि त्याचा साथीदार चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया यांच्या पोलीस कोठडीतील चौकशीसाठी पोलिसांचे अधिकार अबाधित ठेवून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सध्या हे आरोपी येरवडा कारागृहात असून गुन्ह्यात तपासाचा भाग म्हणून त्यांची ओळख परेड घेण्यात आली. त्यामध्ये आरोपी सारखे असलेले बारा जण उभे करून त्यातून आरोपींची ओळख पटवण्यात आली. पीडित तरुणी आणि तिचा मित्र यावेळी उपस्थित होते.