
राज्याला हादरून सोडणाऱ्या सरपंच देशमुख हत्याप्रकरणी मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना बीडमध्येच का ठेवलं?
असा सवाल करत जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे प्रतिनिधी संतोष देशमुख प्रकरण संपवणार असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. शिंदे समितीचा अहवाल आल्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणाला १३९ दिवस पूर्ण झाली आहेत. तरीही या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. आंधळेचा शोध पोलीस आणि सीआयडीचं पथक घेत तरीही कृष्णा आंधळे सापडत नाहीये. दरम्यान देशमुख हत्या प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी वाल्मिक कराड बीडच्या तुरुंगात आहे. देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना बीडच्या कारागृहात ठेवल्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रश्न उपस्थित केलेत.
संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना बीडमध्येच का ठेवलं? हे मला माहित नाही. पण संतोष देशमुख केस फडणवीस आणि प्रतिनिधी संपवणार असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय. देशमुख प्रकरणाची कशा पद्धतशीरपणे विल्हेवाट लावण्यात आलीआहे, हे थोड्या दिवसात कळेल, असं जरांगे म्हणालेत. मला छक्के पंजे करता येत नाहीत. मी प्रामाणिक माणूस असून मी डायरेक्ट वैर घेत असतो.
संतोष देशमुख प्रकरणातील काही सह आरोपींना थांबवण्यात आलेत याची माहिती सरकारच्या प्रतिनिधींनी दिलीय. देशमुख कुटुंब आणि आम्ही ठरवून काही सह आरोपी होणारे थांबवले असल्याचं सरकारच्या प्रतिनिधींनी सांगितल्याचं जरांगे पाटील. पण जेव्हा कधी देशमुख कुटुंबाला गरज पडेल त्या दिवशी मी उभा राहील असं जरांगे पाटील म्हणालेत.
सरकारला सरळ करणार : जरांगे-पाटील
मराठा आरक्षण संदर्भात बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चार मागण्या तात्काळ पूर्ण करणार होते. मात्र आद्याप एकही मागणी पूर्ण झालेली नाहीये. दोन वर्ष झालं माझा समाज रस्त्यावरती आहे. मात्र सरकार विश्वासघात करत आहे. किती संयम असावा आणि कुठपर्यंत असावा असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केलाय.
कुणबी नोंदीमुळे सर्वांचे आनंदी चेहरे झाले आहेत. नोंदी सापडल्याने मुला मुलींना नोकऱ्या लागायला लागल्यात. शिक्षणात सवलती मिळायला लागल्या आहेत. आरक्षणाचा दोन ते अडीच करोड मराठ्यांना याचा फायदा होणार आहे. भावकीतील ज्यांची नोंद सापडली असेल त्यांनी तात्काळ अर्ज करुन प्रमाणपत्र काढून घ्या. नोंदी ज्यांच्या मिळाल्या त्यांनी गावातील ग्रामपंचायतला यादी लावा म्हणजे लोकांना कळेल कुणाच्या नोंदी सापडल्या आहेत, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले आहे.