
दैनिक चालु वार्ता उमरगा प्रतिनीधी -मनोजकुमार गुरव
उमरगा (धाराशिव) मौजे कसगी ता उमरगा चे सुपुत्र लक्ष्मीकांत विठ्ठलराव पटणे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्रतापराव सरनाईक खासदार ओमराजे निंबाळकर आमदार प्रवीण स्वामी आमदार कैलास पाटील
जिल्हाधिकारी श्री कीर्तीकुमार पुजारा साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष शिक्षणाधिकारी सुद्धा साळुंखे. प्राथमिक शिक्षणाधिकारी पाटील साहेब यांच्या हस्ते जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात आले. लक्ष्मीकांत पटणे हे मौजे कसगी येतील रहिवासी असून ते आज रोजी केंद्रीय प्राथमिक शाळा कंटेकुर येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
लक्ष्मीकांत यांनी शासकीय सेवेची सुरुवात श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्था संचालित श्री सिद्धेश्वर विद्यालय कसगी येते दोन वर्ष शिक्षक म्हणून काम करून सरळ सेवा भरती नुसार एकूण जिल्हा परिषद शिक्षक म्हणून सेवेत गेले.
याही अगोदर त्यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या यशाबद्दल संपूर्ण कुटुंबीय मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत धाराशिव येथे सदर पुरस्कार स्वीकारण्यात आले