
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):-इंदापूर विद्यानगरीतील विद्या प्रतिष्ठानच्या संकुलामध्ये महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन संयुक्तरीत्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण संगीकर, तसेच इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या डॉ. ज्योती जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्फूर्तीदायक *महाराष्ट्र गीताने* झाली. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांमध्ये देशप्रेम आणि राज्याविषयी अभिमानाची भावना निर्माण केली.
यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. सुजय देशपांडे यांनी शिक्षकांनी पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना पैसे कसे कमवायचे, स्वावलंबी कसे व्हायचे याचे मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन केले. त्यांनी नाविन्यपूर्ण शिक्षणाच्या गरजेवर भर दिला.
या कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, कामगारांच्या योगदानाबद्दल आदर आणि राज्याच्या वैभवाची जाणीव निर्माण करणारा ठरला.