
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी-
काश्मीर ते कन्याकुमारी अशी भारतभर महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती शासकीय करावी व कर्नाटक राज्यातील बसव कल्याण येथील महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अनुभव मंडपम व परीस कटा हैदराबाद च्या नवाबाच्या वंशजाच्या ताब्यातुन मुक्त करावा या दोन प्रमुख मागण्यांसाठी दिल्ली येथे डिसेंबर महिन्यात संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर शिवा संघटनेच्या वतीने प्रचंड मोर्चा काढण्यात येईल असे प्रतिपादन शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे सर यांनी लोहा लोहा येथे दि.७ रोजी शिवा संघटना तालुका शाखा लोहा च्या वतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या ८९४ व्या जयंतीनिमित्त बोलताना केले.
दि. ७ मे रोजी लोहा शहरात शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवा संघटना तालुका शाखा लोहा च्या वतीने समतेचे पुरस्कर्ते जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या ८९४ व्या जयंतीनिमित्त जुना लोहा येथील महादेव मंदिर येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या मुर्तीची मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करून साऊंड सिस्टीम लावून भजनी मंडळीसह हजारोंच्या उपस्थितीत काढण्यात आली.
सदरील मिरवणूकीचे विसर्जन लोहा येथील व्यंकटेश गाॅर्डन येथे करण्यात आले व या मिरवणूकीचे सभेत रूपांतर झाले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून शिवलिंग शिवाचार्य राजशेखर महाराज अहमदपुरकर लोहा न.प. चे माजी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, माजी जेष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले, महात्मा बसवेश्वर महाराज जयंती मंडळाचे स्वागताध्यक्ष माजी नगरसेवक युवराज वाघमारे, दिनेश मोटे, सेवा जनशक्ती चे जिल्हा प्रवक्ते उत्तमराव भागानागरे,शिवा संघटनेचे नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख इंजि.अनिल माळगे, शिवा कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय कोठाळे , सेवा जनशक्ती पार्टी चे तालुकाध्यक्ष गोविंद हाबगुंडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी प्रथम व्यासपीठावर महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या मुर्तीस वरील मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी यावेळी पुढे बोलताना प्रा. मनोहर धोंडे सर म्हणाले की, शिवा संघटना तालुका शाखा लोहा च्या वतीने लोहा शहरात सलग १८ व्या वर्षी महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती काढण्यात आली आहे व दिवसेंदिवस जयंतीची मिरवणूक दरवर्षी मोठी निघत आहे.
शिवा संघटनेमुळे महाराष्ट्र सह कर्नाटक, आंध्रप्रदेश,तेलंगणा या राज्यात महात्मा बसवेश्वर महाराज यांची शासकीय जयंती होत आहे. तसेच रस्त्यावर भव्य मिरवणूक काढत आहोत.
शिवा संघटनेच्या माध्यमातून वीरशैव लिंगायत समाजाबरोबरच बहुजनांचे अनेक प्रश्न सोडविले आहेत.
शिवा संघटनेच्या अगोदर महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती कुणास ही माहिती नव्हती व कुणी साजरी करीत नव्हते.
जगातील पहिली संसदीय लोकशाही महात्मा बसवेश्वर महाराज यांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून स्थापन केली. महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या अनुभव मंडपम मध्ये सर्व जाती धर्माचे लोक व महिला भगिनींनी सुध्दा होत्या त्यांनी स्त्री -पुरुष असा भेदभाव न करता सामाजिक समता स्थापन केली.
महात्मा बसवेश्वर महाराज यांची पहिली शासकीय जयंती शिवा संघटनेमुळे महाराष्ट्र राज्यात सुरु झाली त्यानंतर कर्नाटक आंध्रप्रदेश व आंध्रप्रदेश चे विभाजन झाल्यानंतर तेलंगणा राज्यात सुरु झाली . आता महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती अक्षय तृतीयाला जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारतात शासकीय झाली पाहिजे.तसेच महात्मा बसवेश्वर महाराज कर्नाटक राज्यातील बसव कल्याण येथे ज्या अनुभव मंडपम व परीस कटा येथे बसुन न्याय दानाचे कार्य करीत होते तो अनुभव मंडपम व परीस कटा शासनाच्या पुरातत्त्व खात्याने त्यांच्या ताब्यात घ्यावा व हैद्राबाद च्या नवाबाच्या वंशजाच्या ताब्यातुन मुक्त करावा या प्रमुख दोन मागण्यांसाठी शिवा संघटनेच्या दिल्ली येथे संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर डिसेंबर महिन्यात मोर्चा काढण्यात येणार असून तेव्हा या मोर्चाला महाराष्ट्रातून विशेष लोहा कंधार मधुन हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर यांनी केले.
तसेच यावेळी माजी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, माजी नगरसेवक बबनराव निर्मले, उत्तमराव भागानागरे,संजय कोठाळे, हनुमंत भाऊ लांडगे यांचे ही भाषणे झाली.
तसेच महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती व भव्य मिरवणूकीचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवा संघटनेचे लोहा तालुकाध्यक्ष हनुमंत भाऊ लांडगे, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बसवेश्वर धोंडे,जिल्हा उपाध्यक्ष मनोज शेलगावकर,शिवा कर्मचारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके सर, शिवा संघटना प्रणित महात्मा बसवेश्वर महाराज जयंती मंडळाचे अध्यक्ष प्रा. सुर्यकांत आणेराव, कोषाध्यक्ष अंकुश सोनवळे,कार्याध्यक्ष पिंटू वड्डे, मा. सरपंच कैलास धोंडे, शिवा व्यापारी आघाडी चे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मानसपुरे,लक्ष्मण कांजले,साधु वडजे, बालाजी एकलारे , राजु पिल्लोळे,कुणाल बोडारे,यांच्यासहित सर्व शिवा मावळ्यांनी व जयंती मंडळ समितीने परिश्रम घेतले.
कार्यक्रमांचे प्रस्तावित महात्मा बसवेश्वर महाराज जयंती मंडळाचे अध्यक्ष प्रा सुर्यकांत आणेराव यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा. चंद्रकांत बेद्रे केले व आभार ज्ञानेश्वर मानसपुरे यांनी मानले