
बारामतीमध्ये आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी पार पडत आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील श्री निळकंठेश्वर पॅनल निवडणुकीत उतरले आहे तर अजित पवार गटाच्या विरोधात माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन कुमार तावरे यांचं सहकार बचाव शेतकरी पॅनल मैदानात आहे.
मात्र याच दरम्यान अजित पवार गटाच्या पॅनलचे प्रचार प्रमुख माळेगाव कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष केशव जगताप आणि तावरे गटाचे पॅनल प्रमुख माजी अध्यक्ष रंजन कुमार तावरे यांची गळाभेट झाली. बारामतीमधील मतदान केंद्राबाहेर हे दोन्ही नेते एकमेकांना भेटले. एकमेकांच्या खांद्यावर हात टाकला आणि बारामतीच्या राजकारणामधील एक सुसंस्कृतपणाही त्यांनी दाखवून दिला आहे.
एक जागा आली म्हणजे सर्व पॅनल नाही: रंजनकुमार तावरे
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी सकाळी नऊ वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली यावेळी ब प्रवर्गातील मतमोजणी अगोदर त्या ठिकाणी पार पडली. यामध्ये श्री नीलकंठेश्वर पॅनलचे ब वर्गाचे उमेदवार अजित पवार यांना तब्बल 91 मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असणारे सहकार बचाव शेतकरी पॅनलचे उमेदवार भालचंद्र देवकाते यांना 10 मते मिळाली. यात अजित पवारांचा 91 मतांनी विजय झाला.
माळेगाव साखर कारखान्यावर अजित पवारांचा झेंडा..
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक ब वर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार आघाडीवर (सकाळी १० वाजेपर्यंत) आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये संस्था प्रतिनिधी ब प्रवर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणूक लढवीत आहेत यामध्ये ते आघाडीवर आहेत. अजित पवार यांच्या विरोधात तावरे गटाकडून सहकार बचाव शेतकरी पॅनल मधून भालचंद्र देवकाते उमेदवार आहेत.