
दैनिक चालु वार्ता माजलगाव प्रतिनिधी- नाजेर कुरेशी.
माजलगाव नगर परिषदेमध्ये कार्यरत असलेले प्रशासक तथा मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांचा मनमानी कारभार सुरू आहे.
जनतेची अनेक कामे खोळंबली आहेत.परंतु पालिका प्रशासन गेंड्याची कातडी पांघरून आहे.या
धोरणाविरुद्ध समाजसेवक व आंबेडकरी विचार मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष सय्यद
सलीमबापू यांनी एल्गार पुकारला आहे.संघटनेच्या वतीने वतीने दि.30 जुन 2025 रोजी नगर परिषदेसमोर रास्ता रोको भरण्याचा इशारा दिला आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात
नागरी समस्या संदर्भात मागण्या करण्यात आल्या आहेत.माजलगाव नगरपरिषद हद्दीमध्ये किरायदार, भोगवटदार,बेघर या गोरगरीब लोकांकडून यापूर्वी नगरपरिषद माजलगाव यांनी ऑनलाईन व ऑफलाईन दोन वेळेस घरकुलचे फॉर्म भरून घेतले आहेत.परंतु अद्यापपर्यत गोरगरीब लोकांना घरकुल देण्यात आलेले नाही. याला मंजुरी देण्यात यावी.गरिबांना शहरात निवारा नाही त्यामुळे त्यांची बिकट अवस्था झालेली आहे. यासाठी घरकुलांची व्यवस्था करण्यात यावी.आझाद नगर येथे अर्धवट रस्ता तयार करण्यात आलेला आहे,तो पूर्ण करण्यात यावा.यामुळे तेथील लोकांची गैरसोय टळेल.तसेच सन २०२० ते २०२५ या वर्षात नगरपरिषद माजलगाव यांनी किती गुंठेवारी केल्या याची यादी देण्यात यावी. किती लोकांना ओपनस्पेच्या बोगस पिटीआर देण्यात आल्या याची माहिती देण्यात यावी.शहरात किती ओपनस्पेस,डीपीरोड आहेत याची माहिती देण्यात यावी.इत्यादी मागण्या करत नगरपरिषद हद्दीतील किरायदार,भोगवटदार बेघर या गोरगरीब लोकांना घरकुल वाटप न केल्यास आपल्या कार्यालयासमोर दि.३०/०६/२०२५ रोजी भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. याची नोद घेण्यात यावी,असा इशारा सय्यद सलीमबापू,एडवोकेट सय्यद अल्ताफ,आंबेडकर विचार मंचच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.