
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी-तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण) : पैठण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विलास बापू भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या निमित्ताने तालुक्यातील मायगाव, नायगाव, वाघाडी, नाथफार्म वाघाडी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करून विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन सरपंच सचिन दिवेकर यांच्या नेतृत्वाखाली व युवानेते किशोर दसपुते यांच्या पुढाकाराने करण्यात आले. गावातील प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, आदीं आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार विलास बापू भुमरे यांचा सामाजिक कार्यातील सहभाग व योगदान याचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनीही या भेटवस्तूंमुळे शाळेत जाण्याचा उत्साह दुप्पट झाल्याचे सांगितले.
यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात गावातील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आ. विलास बापू भुमरे हे केवळ राजकारणी नेते नसून समाजासाठी आपुलकीने काम करणारे व्यक्तिमत्त्व आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रोत्साहन मिळत असून अशा सकारात्मक कार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता वाढेल, असा विश्वास सरपंच व आयोजकांनी व्यक्त केला.