
दैनिक चालू वार्ता उप संपादक धाराशिव- नवनाथ यादव
धाराशिव/बार्शी : प्रथम वर्ष अभियांत्रिकी (पदवी) प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया शनिवार, दि. २८ जून २०२५ पासून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया ८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
बार्शी येथील भगवंत इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (BIT कॉलेज) हे स्क्रुटिनी सेंटर (6781) म्हणून अधिकृतपणे नियुक्त करण्यात आले असून, विद्यार्थ्यांसाठी येथे फॉर्म भरणे, कागदपत्र पडताळणी व मार्गदर्शनाची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती संकुल संचालक मा. ऋतुराज शिवाजीराव सावंत यांनी दिली.
या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी, मूळ कागदपत्रांचे अपलोड, कॅटेगरीसह माहिती भरून अचूकपणे अर्ज भरावा. ही प्रक्रिया बिनचूक व वेळेत पूर्ण केल्यासच विद्यार्थी कॅप राउंडसाठी पात्र ठरतील आणि शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांचा लाभ घेऊ शकतील.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पुढील ठिकाणी प्रवेश सहाय्य सुविधा उपलब्ध आहेत:
▪️ माढा – वेदांत एंटरप्रायजेस – 7218142190
▪️ कुर्डुवाडी – मोरया कॉम्प्युटर – 8262009912
▪️ वैराग – स्वराज नेट कॅफे – 8484886235
▪️ परांडा – नोबल एंटरप्रायजेस – 9975861453
▪️ भूम – हाय इन्फोटेक – 9503668657