
दोन्ही ठाकरे बंधूंवर टीका करताना झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी अकलेचे तारे तोडले होते. ‘तुम्ही लोक आमच्या पैशांवर जगत आहात. तुमच्याकडे कोणते उद्योग आहे.’ असे म्हणत मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न दुबे यांनी केला होता.
यानंतर भाजपची महाराष्ट्रविरोधी मानसिकता असल्याची टीका विरोधकांनी केली होती. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुबे यांना सुनावलं आहे.
दुबे यांचे बोलणे योग्य नाही. यातून निघणारे अर्थ लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करतात. मराठी माणसाचे ऐतिहासिक योगदान महाराष्ट्रात प्रचंड मोठे आहे. देशाच्या जीडीपीत सगळ्यात जास्त योगदान देणारा महाराष्ट्र आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. ते विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
मराठी माणसाचे ऐतिहासिक योगदान महाराष्ट्रात प्रचंड मोठे
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “निशिकांत दुबे हे संघटनेबद्दल बोलले आहे, ते मराठी माणसाला सरसकट बोलले नाहीत. तथापि असे बोलणे योग्य नाही. कारण, याचे निघणारे अर्थ लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करतात. पुन्हा एकदा सांगतो, मराठी माणसाचे ऐतिहासिक योगदान महाराष्ट्रात प्रचंड मोठे आहे.