दैनिक चालू वार्ता उपसंपादक धाराशिव-नवनाथ यादव
धाराशिव /भूम (प्रतिनिधी) –
गावखेड्यातून शिक्षणासाठी एसटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता एसटी आगारात ताटकळत राहावं लागत नाही. परिवहन मंत्री व पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या थेट आदेशानंतर, राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेचा लाभ आता थेट शाळेच्या दारात मिळतोय.
जि.प. हायस्कूल भूम येथे नुकत्याच पार पडलेल्या उपक्रमात तब्बल १५० हून अधिक विद्यार्थ्यांना थेट शाळेत पास वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला असून, “आता ना गर्दीत उभं राहावं लागतं, ना आगाराचे फेरे!” अशी स्पष्ट प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या उपस्थितीत लक्षणीय वाढ झाल्याचं स्पष्ट होतं आहे. शाळेतील शिक्षकही म्हणतात, “एसटी पासमुळे शिक्षण हा हक्क ठरत आहे!”
ही योजना केवळ पासपुरती न राहता ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवण्याची चळवळ ठरते आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार डॉ. तानाजी सावंत, शिवसेना सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली आगारप्रमुख उल्हास शिनगारे यांनी भूमसह तालुक्यातील विविध शाळांमध्ये मोफत पास वाटप मोहिम राबवली.
शिवसेना वैद्यकीय जिल्हाप्रमुख पांडुरंग धस यांनी सडेतोड मत व्यक्त करत म्हटलं, “शाळांमध्ये वेळेवर एसटी पोहोचली, तर ग्रामीण शिक्षणात क्रांती घडेल! ही योजना कागदापुरती न ठेवता कृतीत उतरवणं हीच खरी कामगिरी आहे!”
यावेळी उपस्थित मान्यवर :
शाखाप्रमुख श्रीहरी दवंडे, मुख्याध्यापक श्री. कांबळे, शिक्षक टी. बी. पायघण, पवार के.सी,पाटील डी.जी, गुंजाळ डी.एस, जोशी ए.टी, विधाते व्ही.आर, तांबारे पी.ए, साठे एच.डी, शिंदे सर, नितीन पवार, झरकर ए.के. आदी मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमात केवळ पास नव्हे, तर ग्रामीण शिक्षणाला गती देण्याचा निर्धार दिसतोय!