दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- स्वरूप गिरमकर.
( पुणे ) वाघोली : वाघोली बस स्थानकात सार्वजनिक शौचालयांची स्थिती दयनीय असून यात महिलांसाठी अपुरी व्यवस्था असल्याने त्यांची कुचंबना सुरूच असल्याचे वास्तव दै चालू वार्ताने आपल्या वृत्तपत्रातून रोखठोक मांडत नवीन बांधलेले शौचालय चालू होणार की शोभेची बाहुली म्हणून मिरवणार असा सवाल महानगपालिकेला प्रवाशांच्या प्रतिक्रियेनंतर विचारला होता. दैनिक चालू वार्ताच्या प्रतिनिधीने याबाबत डेपो मॅनेजरशी फोन वरून सवांद साधला असता त्यांनीही हात वर करत सर्व जबाबदारी पालिकेने स्वतः कडे राखून ठेवली आहे असे सांगितले होते. याबाबत प्रवाशी महिला, विद्यार्थी,जेष्ठ नागरिक यांच्या स्थानकाबाबतीतील तक्रारी आपल्या वृत्तपत्रातून परखड मांडल्या होत्या. तदनंतर उशिरा का होईना पण महानगरपालिकेला जाग आली असून नव्याने बांधण्यात आलेले स्वछतागृह प्रवाशांसाठी सुरु करण्यात आले आहे.नव्याने बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृह सर्वांसाठी खुले केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करीत ‘दैनिक चालू वार्ता ‘चे आभार मानले.
प्रवाशांच्या तक्रारींचे वेळेत निवारण होईल याची खबरदारी घ्यावी आणि प्रवाशांचे अभिप्राय घेऊन पारदर्शकता वाढवावी.
– प्रवाशी, वाघोली बस स्थानक.