दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : गुरु-शिष्य परंपरेचा वारसा जपत आणि जीवनात गुरूचे स्थान अधोरेखित करत शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, हंडरगुळी ता. उदगीर येथे दिनांक 10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सय्यद रफिक सर होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व पटवून दिले. गुरु हे केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण जीवन मार्गदर्शक असतात, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले विद्यालयाचे संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक यादव जगताप उपस्थित होते. त्यांनी गुरु व शिष्य यांच्यातील नात्याचा अर्थ सांगताना विद्यार्थ्यांना गुरु कसे निवडावे व त्यांच्या मार्गदर्शनाने जीवनात कसे यश मिळवावे यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्येकाने जीवनात सुखी, समाधानी व यशस्वी होण्यासाठी गुरुमंत्र दिला.
तसेच सौ. गायकवाड पी.एन. यांनी कथाकथनाच्या माध्यमातून गुरु-शिष्य परंपरेचे महत्व उलगडून दाखवले. गुरूंच्या शिकवणीने जीवनात यश व समृद्धी प्राप्त होऊ शकते याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन विद्यालयाचे पर्यवेक्षक सुगावे बालाजी, सौ. येलाले के.व्ही., सौ. गुडाप्पे आर.एस. यांनी केले. कार्यक्रमाची खास आकर्षण ठरले प्राथमिक विभागातील चिमुकल्यांचे मनमोहक नृत्य सादरीकरण. त्यांनी अतिशय सुरेख पद्धतीने आपली कला सादर करत उपस्थितांचे मन जिंकले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील विद्यार्थिनी जाधव साधना हिने केले, तर आभार प्रदर्शन उडते प्रिया हिने मानले. यावेळी सौ. बिरादार के.के., सौ. कनकुरे एम.एम., कुरुळेकर एस.एन., सुमयाँ तांबोळी, सौ. जवळे जे.आर., सौ. संगमवार एस.टी., सौ. भंडारे एस.जी., सौ. डावळे एम.ए., घटकार रामचंद्र, जाधव रविप्रकाश, नाटकरे बालाजी, मोमीन अजीज, गायकवाड संजय, मैलारे एम.टी., पाटील राजकुमार, कणसे व्ही.एस., गायकवाड भिमकिरण, मळभागे शिवानंद, कासले वैभव, भोसले अभिजित, विनित सूर्यवंशी, श्रीमती बिरादार राजश्री यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि प्रेरणादायी बनले होते.