
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी-लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :
येथून जवळच असलेल्या लोहा तालुक्यातील पोखरभोसी येथील भूमिपुत्र तथा वडेपुरी जि.प.हायस्कूलचे सहशिक्षक व महाराष्ट्रातील सर्व जि.प .प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविणारे तंत्रस्नेही शिक्षक अनिल कांबळे यांनी दि.१० जुलै रोज गुरूवार ह्या दिवशी गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
ज्या गावात आपला जन्म झाला , त्या गावाचे आपणाला कही तरी देणे लागते . गावातील शाळे बद्दल असलेले प्रेम , आपुलकी, जिव्हाळा शाळेचे काही प्रमाणात ॠण फेडण्यासाठी त्यांनी जि.प.प्राथमिक शाळा पोखरभोसी येथील सर्व विद्यार्थ्यांना वही,पेन हे शैक्षणिक साहित्य गावकऱ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले . साहित्य वाटप केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित दिसून आला. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक हरी मुळे हे होते . तर प्रमुख पाहूणे म्हणून विक्रम डांगे ( शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ),श्रीनिवास पाटील ताटे ( अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती पोखरभोसी ),दयानंद पाटील ताटे ( माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती पोखरभोसी ),सुर्यभान डांगे ( भारतीय सैनिक ),गजानन पाटील डांगे ( माजी सदस्य शाळा व्यवस्थापन समिती ),यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व गावकरी उपस्थित होते.
___________________________
अनिल कांबळे यांनी गावातील मुलांनी व मुलींनी तन मन लावून अभ्यास करून गावाचे नाव रोषण करावे. आपल्या गावातून एखादा मोठा अधिकारी बनवावा याचे अभिमान गावकऱ्यांना असणार आहे. असे मत व्यक्त केले आहे.
___________________________
ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भी.कुभागावे यांनी केले तर आभार महाबळे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरी मुळे ( मुख्याध्यापक ), सौ.शिंदे मॅडम , सौ.गुट्टे मॅडम, वाघमारे ,कुभारगावे ,पाटील ,कानगुलवार ,शेख ,महाबळे यांनी परिश्रम घेतले.