
दैनिक चालू वार्ता माळशिरस प्रतिनिधी – राजेंद्र पिसे
नातेपुते प्रतिनिधी:
वै. ह भ प गुरुवर्य मनोहर महाराज भगत यांची नातेपुते परिसर वारकरी समाज दिंडी सोहळा आळंदी ते पंढरपूर पायी वारी या दिंडीची सांगता गोपालकाल्याच्या कीर्तनाने झाली.नातेपुते येथील बळीराजा पतसंस्थेचे जेष्ठ संचालक गणपत कृष्णाजी पांढरे यांच्या वतीने गोपालकाला व गुरुपौर्णिमा निमित्ताने संत पूजन तसेच कीर्तन व महाप्रसाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी नातेपुते दिंडीचे चालक, ह भ प श्रीराम महाराज भगत यांनी आपल्या कीर्तन सेवेत पंढरीचे महत्व, वारकरी संप्रदायाचे महत्त्व, दिंडीमध्ये पायी चालण्याचे महत्त्व, गोपालकाल्याचे महत्व,आजच्या दिवसाला गुरुपौर्णिमा व व्यासपौर्णिमा ही म्हणतात कारण आजच्या दिवशी महर्षी व्यासांनी वेदांचे ज्ञान जगासमोर उघड केले,व्यास महर्षींनां आपल्या संस्कृतीमध्ये आद्यगुरू मानलें जाते. व्यासांनी महाभारत या अलौकिक ग्रंथातून धर्मशास्त्र, नितीशास्त्र, मानसशास्र आणि व्यवहार शास्त्राचे तसेच भाव भक्तीचे दर्शन जगाला घडविले.तिथीनुसार हा दिवस महर्षी व्यासांचा जन्मदिवस मानला जातो म्हणून या दिवशी व्यासपूजन गुरुपूजन केले जाते, या दिंडीचे यंदाचे रौप्य महोत्सव सोहळा वर्ष तथा २५ वे वर्ष होते नातेपुते परिसरातील भाविकांनी आतापर्यंत दिंडीस भरभरून प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानून दिंडीस यापुढे मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी आरती पसायदान घेऊन महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता झाली, यावेळी नातेपुते दिंडीचे मार्गदर्शक गणपतराव पांढरे नगरसेवक रावसाहेब पांढरे,बाबा बरडकर, बाळासाहेब पांढरे,माऊली सरक, ॲड.राजेंद्र सोनवळ तुकाराम ठोंबरे,साहेबराव देशमुख,अवधूत उराडे,मयूर पाडसे,गोरख ढोबळे, विठ्ठल अर्जुन,अरुण उराडे, छगनराव मिसाळ, माऊली राऊत, काशिनाथ बुवा बंडगर, किसनराव बंडगर, बबन पांढरे,रमेश पांढरे, दत्तू रुपनवर,गोरख रुपनवर,विष्णू रुपनवर,नवनाथ बिचुकले,किशोर दगडे, अनिल कुचेकर,श्रीकृष्ण महाराज भगत, गणेश महाराज भगत, हर्षवर्धन महाराज माने, माणिक महाराज इंगळे,लक्ष्मण महाराज पिंगळे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश गणपत पांढरे संजय पांढरे तसेच पांढरे परिवार व नातेपुते दिंडीतील भाविक भक्त भजनी मंडळ ग्रामस्थ उपस्थित होते.
ऊन वारा पाऊस याची तमा न बाळकता वारकरी भाविक भजन नामस्मरण करत आळंदी ते पंढरपूर पायी वारी परंपरेने अतिशय श्रद्धेने करीत असतों यंदाच्या वर्षी सुध्दा माऊलींच्या पालखी सोहळ्यातील आमचे गुरुवर्य वै. ह भ प मनोहर महाराज भगत यांच्या दिंडीतील वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाल्याने खूप आनंद होतोय आणि यापुढे दिंडीच्या गोपालकाल्याची कायमस्वरूपी परंपरा आमच्या परिवाराकडे राहणार आहे यातून वारकरी भाविकांची सेवा करण्याची संधी दरवर्षी मिळणार आहे.
सुरेश गणपत पांढरे
माजी ग्रामपंचायत सदस्य नातेपुते