
दैनिक चालु वार्ता ठाणे-प्रतिनिधी-नागेश पवार
————-
ठाणे – वागळे इस्टेट पोलीस ठाणे व PDC संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महिला सबलीकरण, लैंगिक शोषणविरोधी जनजागृती, सायबर सुरक्षाविषयक मार्गदर्शन व अंमली पदार्थविरोधी जनजागृती यासंदर्भात सकाळी ११ ते १२:३० यावेळेत सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात PDC संस्थेमार्फत पथनाट्य सादरीकरण करून विद्यार्थिनींमध्ये जनजागृती करण्यात आली, तसेच महिला पोलिस अधिकाऱ्यांनी विविध संवेदनशील विषयांवर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी वागळे इस्टेट,श्रीनगर व कोपरी पोलीस स्टेशनच्या महिला अधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, ७ शिक्षिका व सुमारे १०० ते १५० विद्यार्थिनी यात सहभागी झाल्या होत्या.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठाणे पोलीस सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी पोलीस प्रशासनाकडून म्हटले गेले.