
दैनिक चालू वार्ता उप संपादक धाराशिव-नवनाथ यादव
धाराशिव/भूम : आगामी जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने भूम येथे विधानसभा स्तरावरील नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत भूम, परांडा व वाशी विधानसभा मतदारसंघातील एकूण १३ जिल्हा परिषद गट व २ नगरपालिका गटासाठी निरीक्षकांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
भूम तालुक्यात ईट- तानाजी महानवर, देवळाली- नानासाहेब मदने, पाथरुड-संतोष हराळ, वालवड- गजानन सोलंकर व माणकेश्वर- किशोर डोंबाळे यांची नियुक्ती करण्यात आली. परांडा तालुक्यात शेळगाव – मनोज पाडुळे, लोणी – पंडित मारकड, डोंजा – अँड. विकास पाटील, अनाळ – अनिल नायकवडी, जावळा – अब्दुल पटेल यांना जबाबदारी देण्यात आली आहे. वाशी तालुक्यात तेरखडा – पंडित मारकड, पारा – विशाल कोरडे, पारगाव – अँड. विकास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. भूम नगरपालिका निरीक्षक म्हणून नानासाहेब मदने व परंडा नगरपालिका निरीक्षक म्हणून मनोज पाडुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या बैठकीस प्रदेश कार्यकारिणी सदस्य नानासाहेब मदने, मराठवाडा अध्यक्ष अश्रुबा कोळेकर, जिल्हाध्यक्ष अँड. विकास पाटील, धाराशिव लोकसभा अध्यक्ष पांडुरंग लोकरे, सोलापूर जिल्हाध्यक्ष विकास आलदर, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष पंडित मारकड तसेच तालुकाध्यक्ष संतोष हराळ (भूम), मनोज पाडुळे (परांडा), विशाल कोरडे (वाशी) उपस्थित होते.
बैठकीत आगामी निवडणुकांसाठी संघटन बळकट करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमात भारतीय सैन्यात भरती झालेल्या तानाजी मदने व पोलीस दलात निवड झालेल्या अंगद मारकड या युवकांचा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या युवकांचा गौरव हा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.