
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना (मंठा )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केहाळ वडगाव शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सुरेश दवणे व उपाध्यक्षपदी ओंकार नाईक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केहाळ वडगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीचा कार्यकालाची मुदत संपली असल्याने २०२५ ते२०२७ या दोन वर्षाच्या कालावधीसाठी नवीन शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांची निवड करून समिती नव्याने गठीत करण्यात आली आहे यासाठी पालकांची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती केहाळ वडगाव येथील शालेय व्यवस्थापन समिती या सभेत गठन करण्यात आली समितीच्या अध्यक्षपदी सुरेश ज्ञानेश्वर दवणे उपाध्यक्षपदी ओंकार प्रदिपराव नाईकयांची निवड करण्यात आली आहे समितीच्या सदस्यपदी सौ. नीता विजय दवणे,सौ. कमल फकीरा साळवे. सौ.लता गजानन नाईक. सौ.कौशल्या रामचंद्र शिंदे, श्री दीपक डीगांमबरराव दवणे.श्री.संतोष शिवाजी दवणे. सौ शिंदू भागवत दवणे, सो. चंदा सुदर्शन दवणे,शिक्षण प्रेमी सोहम प्रल्हाद दवणे, चिरंजीव हर्षल सिद्धेश्वर दवणे,कुमारी ईश्वरी भरत दवणे, शिक्षक प्रतिनिधी श्री भुसकुटे डी. डी., सचिव पदी शाळेचे मुख्याध्यापक श्री एस. एन.चरकेवाड हे पदसिद्ध सचिव म्हणून निवड करण्यात आली मुख्याध्यापक यावेळी नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्यांचा सत्कार करण्यात आला यावेळेस विविध वर्गातील विद्यार्थ्यांचे पालक तथा शिक्षण प्रेमी तुकाराम दवणे, राजेभाऊ नाईक,विजय दवणे, अशोक दवणे, सिद्धेश्वर दवणे पांडुरंग दवणे ओंकार दवणे,वसंत हरबक,कृष्णा गडदे, अशोक दवणे (गुरु )सतीश दवणे, गजानन नाईक, भरत दवणे,विठ्ठल दवणे,पवन नाईक, धनंजय दवणे यांची उपस्थिती होती, सूत्रसंचालन डी. डी. भुस्कुटे यांनी केले मुख्याध्यापक एस. एन. चरकेवाड यांनी मार्गदर्शक केले आभार प्रदर्शन श्री कांबळे सर यांनी केले.