
दैनिक चालु वार्ता कोल्हापूर प्रतिनीधी – पंडित चौगुले
कोल्हापूर दि. 15 : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुका (सांगरूळ मतदारसंघ) येथील मौजे प्रयाग चिखली या गावी दलित वस्ती सुधारण्यासाठी निधी मिळाला आहे. त्या निधीमधून समाज मंदिर बांधण्याचे काम सुरू आहे.
पण जी सदरची जागा ही सार्वजनिक श्री विठ्ठल मंदिर व्यवस्थापक शंकर कांबळे यांच्या मालकीची आहे सदर बांधकाम हे सार्वजनिक श्री विठ्ठल मंदिराची इमारत पाढून त्या जागेवर समाज मंदिर बांधकाम सुरू असून या ठिकाणी सर्वच प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होतात शासनाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही धार्मिक स्थळावर शासकीय निधी खर्च करता येत नाही असे असताना सदर जागेचे व्यवस्थापक मंडप धारक व त्यांचे वारस यांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता शासनाने परस्पर बांधकाम सुरू केले आहे सदरचे चालू असलेले बेकायदेशीर बांधकाम तात्काळ थांबून शासनाची व्यवस्थापक व मंडप धारक यांची फसवणूक केली असल्याने संबंधित अधिकारी यांची ताबडतोब चौकशी करून त्यांच्यावर विना विलंब योग्य ती कारवाई करावी अन्यथा आम्हाला नाविलाजास्तव आपल्या विरोधात स्वातंत्र्य दिली दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी समस्त बौद्ध समाजा वतीने लोकशाही पद्धतीने आमरण साखळी उपोषण करण्यात येईल याची सर्वस्व जबाबदारी शासनावर राहील अशी नोंद घ्यावी.
निवेदन देतेवेळी माननीय उपजिल्हाधिकारी यांनी कार्यकर्त्यांना कारवाई व चौकशीसाठी पुढे पाठवून योग्य तो निर्णय होईल अशी ग्वाही दिली यावेळी समाजातील बौद्ध अनुयायी उपस्थित होते श्री अनिल कुरणे,विठ्ठल कांबळे, रंगराव कामत, आर के पेंटर, सुनील कांबळे,विकास कांबळे, विशाल कांबळे, कुंडलिक कांबळे, रोहित कांबळे, दादासो कांबळे,ऋषिकेश कांबळे, प्रवीण कांबळे,रघुनाथ कांबळे, सागर कांबळे,रणजीत कांबळे, लक्ष्मण कांबळे,भानुदास कांबळे, असे मोठ्या संख्येने बौद्ध समाज उपस्थित होता.