
खदखद बाहेर येताच अमित ठाकरेंनी फोन फिरवला !
मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन इगतपुरी येथील तीन दिवसीय शिबिरात आमंत्रित न केल्याने नाराज झाले आहेत. “मनसेत दिवाळी आहे, माझ्या घरात अंधार आहे,” अशा शब्दांत महाजन यांनी आपली खंत व्यक्त केली आहे.
देव बदलणार नाही, पण देवाने बोलावल्याशिवाय देवळात जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली आहे. मराठीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत, तर महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही, असंही प्रकाश महाजन यांनी म्हटलं होतं. तसेच, ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि मनसेची युती व्हायला हवी, अशी वैभव खेडकर यांची आग्रही मागणी आहे. मात्र, इगतपुरीमध्ये सुरू असलेल्या मनसेच्या तीन दिवसीय शिबिराला या दोन्ही नेत्यांना बोलावण्यात आलेले नाही. ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि मनसेच्या युतीबाबतचा त्यांचा आग्रह हेच यामागचे कारण आहे का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी हे शिबिर एमएमआर (MMR) विभागापुरते मर्यादित होते, त्यामुळे प्रकाश महाजन यांना निमंत्रण दिले नसल्याचे सांगितले आहे. ते प्रकाश महाजन यांच्याशी बोलणार असल्याचेही त्यांनी नमूद केले होते, त्यानंतर त्यांनी आणि अमित ठाकरेंनी त्यांना फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे.
अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांनी प्रकाश महाजन यांना फोन
प्रकाश महाजन यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांनी प्रकाश महाजन यांना फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे. प्रकाश महाजन यांची नाराजी अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांनी समजून घेतली. मनसेत नाराज असणाऱ्या प्रकाश महाजन यांच्यासोबत काल (मंगळवारी,ता 15) मनसे नेते अमित ठाकरे यांनी फोन करून बातचीत केली तर आज सकाळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही प्रकाश महाजन यांच्या सोबत बातचीत केली असल्याची माहिती आहे. इगतपुरी येथे झालेल्या मनसेच्या शिबिराला प्रकाश महाजन यांना बोलावण्यात आले नव्हते यावरून प्रकाश महाजन हे नाराज आहेत त्यांनी त्यांची उघड नाराजी व्यक्त केली आहे.
मी ठरवलंय मी देव बदलणार नाही
मी इतर कुणावर नाही तर माझ्यावरच नाराज आहे. प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला अभिमान आणि गर्व वाटेल असंच काम मी केलं. प्रवक्ता म्हणून केलं. भविष्यात ते अभिमानाने म्हणतील की प्रकाश महाजन नावाचा प्रवक्ता आमच्याकडे होता, मी ठरवलंय मी देव बदलणार नाही देवानं बोलवल्याशिवाय जाणार नाही. मनसेत दिवाळी आहे, माझ्या घरात अंधार आहे, देव बदलणार नाही, पण देवाने बोलावल्याशिवाय देवळात जाणार नाही असंही प्रकाश महाजन यांनी म्हटलं होतं.
मनसेच्या राज्यस्तरीय शिबीर
नाशिकमध्ये मनसेच्या राज्यस्तरीय शिबीर सुरू आहे. या शिबिरासाठी स्वत: राज ठाकरेंसह सर्व वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. मात्र या शिबिराला प्रकाश महाजन यांनाच निमंत्रण दिलेलं नाही. प्रकाश महाजन यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत केलेलं भाष्य आणि त्यांचा मीडियातील वावर यावरुन त्यांना साईडलाईन केल्याची चर्चा आहे. याबाबत प्रकाश महाजन यांनी एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षात एकटं पडल्याची भावना अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली. “भाजप खासदार नारायण राणे यांच्यासोबत टीका टीपण्णी झाली त्यावेळेस माझ्यावर शाब्दिक हल्ला केला. पण मनसेतील कोणत्याही वरिष्ठ नेत्यांना जाहीर माझी बाजू घेतली नाही. मी नाराज नाही खिन्न आणि दुःखी आहे” असं प्रकाश महाजन म्हणाले.
पक्षाचा निर्णय आहे कुणाला बोलवाव, कुणाला नाही
नाशिकमध्ये शिबिरासाठी बोलावलं नाही. पण पक्षाच्या निष्कर्षामध्ये प्रवक्त्यांना बोलावलं नाही. इतर प्रवक्ते आहेत त्यांच्याकडे इतर पदांची जबाबदारी असेल, माझ्याकडे नाही. त्यामुळे मला निमंत्रण आलं नाही. पक्षाचा निर्णय आहे कुणाला बोलवाव, कुणाला नाही. हा माझ्यासाठी दुर्दैवी क्षण आहे काय बोलणार, असं प्रकाश महाजन म्हणाले. घरच्या लोकांसमोर तोंड राहिलं नाही. ठीक आहे मला फार काही बोलायचं नाही. मी इतर कुणावर नाही तर माझ्यावरच नाराज आहे. प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला अभिमान आणि गर्व वाटेल असंच काम मी केलं. प्रवक्ता म्हणून केलं. भविष्यात ते अभिमानाने म्हणतील की प्रकाश महाजन नावाचा प्रवक्ता आमच्याकडे होता, असं म्हणत प्रकाश महाजन यांनी खंत बोलून दाखवली.
देव बदलणार नाही
मी ठरवलंय मी देव बदलणार नाही, देवानं बोलवल्याशिवाय जाणार नाही. मी कुणावर नाराज नाही. आपलं नशीब, आपलं भांडण, नशीब असेल तर हार-जीत होते. दोन भावाच्यां युतीबाबत वक्तव्य केलं होतं. हे कोणाला पटलं नसेल तर त्याची माफी मी नेत्याकडे मागितली आहे, असं महाजनांनी नमूद केलं.
राणेंनी ज्यावेळेस माझ्यावर शाब्दिक हल्ला केला, त्यावेळी कोणत्याही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना जाहीर माझी बाजू घेतली नाही. माझ्या परिवाराला धमक्यांचे फोन येत होते. परिवार अस्वस्थ होता. एक तर मी नारायण राणेंची माफी मागावी किंवा त्याच्याविरुद्ध लढावं असे दोन पर्याय होते. मी दुसऱ्या पर्यायाला निवडलं.परंतु मला पक्षातल्या कोणीही ज्येष्ठ व्यक्तीने जाहीर बाजू मांडली नाही. खूप वाईट वाटलं पण मी तेही विसरून कुटुंब एकत्र यावं ही भूमिका घेतली.
पक्षाची दिवाळी, माझ्या घरात अंधार
दोन भाऊ एकत्र आले तर माझा फायदा काय आणि नुकसान काय? भाऊ नसण्याचं काय दुःख आहे हे मला माहीत होतं. ते एकत्र यावे ही मी भावना बोलून दाखवली. ही भावना चुकली असेल पण पक्षात दिवाळी आहे म्हणजे पक्षाचे शिबिर सुरू आहे आणि माझ्या घरात अंधार अशी सध्या स्थिती आहे.माझं बोलणं, माझा मीडियातला वावर मला त्रासदायक ठरला. मी नाराज नाही खिन्न आणि दुःखी आहे. माझी आता भावना झाली आता बस झालं आपल्याला घरातच मान नाही तर इतर ठिकाणी काय मिळणार? असं प्रकाश महाजन म्हणाले.
अशा पद्धतीने पक्ष मला वागवत असेल तर मी कोणत्या तोंडाने पक्षाची बाजू मांडू असं म्हणत प्रकाश महाजन यांच्या डोळ्यात पाणी आले. फेसबुकवर प्रतिक्रिया येतात याला पक्षातच किंमत नाही. नसलेले आरोप माझ्यावर टाकले जातात. मी गेल्या तीन चार दिवस अस्वस्थ आहे, असं प्रकाश महाजन म्हणाले.