
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर): पोलिस दलात काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना आपल्या परिवारपासून दूर राहून आपले कर्तव्य बजवावावे लागत असल्याने त्यांना या सणापासून वंचित राहावे लागत असल्याचे लक्षात घेत तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिताताई खरात यांनी सालाबाद प्रमाणे यावर्षीही इंदापूर पोलीस चौकीत रक्षाबंधन साजरे केले.पोलिस कर्मचाऱ्यांना राखी बांधून आपली सामाजिक बांधिलकी जपली.
अहोरात्र कर्तव्य बजावून जनतेचं रक्षण करणाऱ्या पोलिस बांधवांना बहिणीची उणीव भासू नये. त्यामुळे या पोलिस कर्मचाऱ्यांना राख्या बांधून आज त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे केले. दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो, देव त्यांच रक्षण करो, अशी प्रार्थना या पोलीस बांधवांसाठी अनिताताई खरात यांनी देवाकडे केल्याचं यावेळी पहायला मिळालं.
जे कायमच आपल्या लाखो बहिणींचे संरक्षण करतात नेहमी महिलांच्या आपल्या बहिणींच्या संरक्षणासाठी दिवस रात्र एक करतात असे आमचे पोलीस बांधव यांना तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने राखी बांधून त्यांच्याकडून सदैव आम्हा बहिर्णीचें कायमस्वरूपी संरक्षण करावे अशी अपेक्षा आणि हीच रक्षाबंधनाची भेट स्वीकारण्यात आली, माझे पोलीस भाऊ सदैव बहिणींचे रक्षण करतात आणि त्यांनी आमच्या पाठीशी कायमच खंबीरपणे उभे रहावे हे वचन त्यांच्यांकडून आज मी भेट स्वरूपात घेते, असे यावेळी तेजपृथ्वी ग्रूपच्या संस्थापक अध्यक्षा अनिताताई खरात म्हणाल्या.