
दैनिक चालु वार्ता शिराढोण प्रतिनिधी -गजानन देवणे
रक्षाबंधन हा सण प्राचीणभारतीय संस्कृती व परंपरेचे प्रतीक आहे तसेच भारतीय स्त्रीचे विशिष्ट स्थान सूचित करणारा सण आहे. राखीचा मंगलमय धागा स्त्रीचे शक्ती अणि उपासनेचे प्रत्यक्ष प्रमाण आहे. रक्षा बंधनाच्या दिवशी बांधली जाणारी राखी स्त्रिच्या सहज सुंदर प्रेमाचे प्रतिक आहे. बहिण भावाला राखी बांधुन भावासाठी शुभकामना प्रकट करते तसेच भावाने बहिणीचे रक्षण करावे याचे प्रतीक आहे. त्याच प्रमाणे भाऊ आपल्या बहिणीला आपल्या परीणे भेट देत असते.
या दिवशी जिकडे तीकडे आनंद बहरत असतो. त्याचप्रमाणे मौजे शिराढोण तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील सौ. संध्या माणिक चौडम, प्रणिता गजानन संगेवार, शिवानी विजय भुरे, मंगल भगवान कळसे, लक्ष्मीबाई शंकर कटवड, नंदाबाई व्यंकटी बोंदकुले, निर्मला शिवाजी पत्तेवार आदी लाडक्या बहिनींनी रक्षाबंधनच्या मुहूर्तावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस (देवा भाऊ) यांना राख्या पाठवले आहेत. आपल्या लाडक्या भावाला रक्षाबंधन निमित्त राखी सोबत काही मागण्याचे निवेदन केले आहे. लाडक्या बहिणींना दीड हजार ऐवजी 2100 रु. देण्यात यावे, उज्वला योजने अंतर्गत लाभ मिळालेल्या बहिणींना तीनशे रुपये ऐवजी वाढीव अनुदान मिळण्यात यावे, तसेच लाडक्या भाऊजींना शेतीची कर्जमाफी द्यावी अशी मागणी रक्षाबंधन निमित्त शिराढोण येथील लाडक्या बहिणींनी देवा भाऊ कडे मागणी केली आहे.
नक्कीच देवा भाऊ लाडक्या बहिणींच्या मगणीचा विचार करतिल हे सर्व लाडक्या बहिणींना खात्री आहे.