
‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले…
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
निवडणुका होण्याआधी राज्यात उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या पक्षांची युती होणार अशी एक चर्चा रंगू लागली होती. दरम्यान मुंबईतील प्रतिष्ठित बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणूक २०२५ मध्ये ठाकरे बंधूंना दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यान त्यांच्याविरोधात प्रसाद लाड व शशांक राव यांचे पॅनल विजयी झाले आहे. विजय होताच भाजप नेते प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना डिवचले आहे.
राजय्त लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार आहे. ठाकरे बंधू मराठी भाषेशी संबंधित निर्माण झालेल्या वादावर ठाकरे बंधू अनेक वर्षांनी एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले. बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणूक ही ठाकरे बंधूंसाठी लिटमस टेस्ट असल्याचे म्हटले जात होते. मात्र पहिल्याच परीक्षेत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला आहे. दरम्यान ठाकरे बंधू एकत्रित आल्याने काही फरक पडणार नाही असे महायुतीने सांगितले होते. त्यामुळे आता राज ठाकरे व उद्धव ठाकरे युतीसंदर्भात काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.
मनसे आणि युबीटी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने उत्कर्ष नावाचे पॅनल या निवडणुकीत उभे केले होते. याद्वारे त्यांनी २१ उमेदवार उभे केले होते. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने १८, राज ठाकरे यांच्या पक्षाने २ तर एक उमेदवार अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती संघाचा होता. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना युबीटी आणि राज ठाकरे यांच्या मनसे यांच्यातील युतीबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. दरम्यान, उद्धव गटाने असेही म्हटले आहे की, दोन्ही भाऊ येत्या महानगरपालिका (BMC)निवडणुकीत एकत्र लढतील.मात्र अद्याप दोन्ही बाजूंनी कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही.
दरम्यान मराठी भाषेवर जो वाद निर्माण झाला होता, त्यानंतर राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे जवळपास 18 ते 19 वर्षांनी एकत्रित आल्याचे पाहयला मिळाले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून दोन्ही नेत्यांनी लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्र यावे अशी मागणी केली जात होती. दरम्यान ‘बेस्ट’ निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे पॅनल उभे केले होते. मात्र त्यांचा या निवडणुकीत सपशेल पराभव झाला आहे. त्यामुळे आगामी काळात हे दोन्ही बंधु एकत्रित येणार का हे पहावे लागणार आहे.