
ठाकरे बंधूंचा पराभव केल्यानंतर शशांक राव यांनी सगळंच केलं उघड; मी भाजपाचा…
बेस्ट पतपेढीतील 9 वर्षाची सत्ता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने गमावली आहे. बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांच्या सर्वाधिक 14 जागा तर भाजपच्या 7 जागा निवडून आल्या.
ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला भोपळाही फोडता आला नाही. निकालानंतर बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांनी प्रसारमाध्यमंशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांचे आभार मानले आहेत. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आम्हाला कामगारांसाठी, न्यायहक्क मिळवण्यासाठी मदत करतात त्याचा फायदा होतो असं त्यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने कामगारविरोधी आणि खासगीकरणाचं धोरण चालवलं आहे, त्याविरोधात कामगारांनी नोंदवलेलं हे मत आहे. बीएसटीची जी दशा झाली आहे त्याला शिवसेना आणि त्यांची बेस्ट कामगार सेना युनिअन जबाबदार आहे. कमिटीत असताना अनेक वर्ष त्यांनी फक्त आपल्या फायद्यासाठी बीसीएटीचं नुकसान केलं,” अशी टीका त्यांनी केली. अनेक वर्षं कामगारांचा लढा लढत आहोत. तो मुद्दा कामगारांपर्यंत नेला आणि त्या बाजूने त्यांनी हे मत दिलं असंही ते म्हणाले.
‘देवेंद्र फडणवीसांनी मदत केली’
ठाकरे बंधूंसंदर्भात विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “दोन भाऊ एकत्र आले की नाही हा प्रश्न नाही. मुळात जर कामगारांसाठी काम कराल तर एकटे असल्यासही निवडून आणू हे कामगारांनी दाखवून दिलं आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असतानाही मदत करत होते. आशिष शेलार यांनीही बीएसटीच्या कामगारांसाठी आम्हाला मदत केली आहे. तीन वर्षानंतरही ग्रॅज्युटी मिळाली नाही यासंबंधी मोर्चा काढला तेव्हा आशिष शेलार यांनी मदत केली. कामगारांसाठी मदत केली त्याची ही पोचपावती आहे.
तुमची संघटना भाजपाशी संबंधित आहे का? असं विचारलं असता ते म्हणाले, “आमची संघटना कोणत्याही पक्षाशी संलग्न नसते. 1946 ची संघटना असून यात अनेक नेते होते. जॉर्ज फर्नांडिस अध्यक्ष होते, शरदराव सरचिटणीस होते. जॉर्ड फर्नांडिस एनडीएचा भाग होते, संरक्षण मंत्री होते. कामगारंची संघटना ही कामगारांसाठी काम करते आणि त्यात उद्धेशाने काम करतो”.
‘मी भाजपाचे विचार मानतो’
पुढे ते म्हणाले, “मी भाजपाचे विचार मानतो. मी ज्या पक्षात आहे, नक्कीच त्या पक्षाचे विचार मानतो. या पक्षाकडून जी काही मदत हवी ते घेतो. कामगार संघटनेचा एकच हेतू असतो. एनसीपीत असताना शरदराव यांनी त्या पक्षाची मदत घेत न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे फडणवीस, शेलार आम्हाला कामगारांसाठी मदत करतात. न्यायहक्क मिळवण्यासाठी मदत करतात त्याचा फायदा होतो.
आम्ही फक्त कामगारांच्या हिताचं काम केलं. कोणीही एकत्र आलं तरी, जर कामगारांचं हित पाहिलं नाही तर त्यांना असेच भोपळे मिळतील,” असा टोलाही त्यांनी ठाकरे बंधूंना लगावला.
‘ब्रँड अनेक असतील पण…’
“जे बोलतात त्यांनी विचार करावा. 9 वर्षं त्यांनी भ्रष्टाचार केला. 20 वर्ष कमिटीत भ्रष्टाचार केला. ग्रॅज्यूटीचे पैसे 3 वर्षं दिले नाहीत. शिवसेनेकडे कमिटी असताना ते पैसे त्यांनी ठेकेदारांना वाटले. आज कामगारांना त्यांची हक्काची ग्रॅज्यूटी मिळत नाही. ब्रँड अनेक असतील पण जो कामगार हिताचं काम करेल तो टिकेल,” असंही त्यांनी सुनावलं.
‘उद्धव ठाकरेंमुळे बीएसटीची दशा’
2017 मध्ये उद्वव ठाकरेंनी बीएसटीचं विलीनकरण महापालिकेच्या अर्थसंकल्पात करतील असं सांगितलं होतं. पण मुख्यमंत्री झाल्यावरही त्यांनी केलं नाही. बीएसटीत मालकीच्या गाड्या कमी होत आहेत. आता फक्त 250 गाड्या शिल्लक आहेत. 2019 मघ्ये बेस्ट वर्कर्स युनिअन आणि बीएसटीचा मालकीच्या 3337 बसगाड्या राखल्या पाहिजेत असा एमओयू आहे. नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा कमिटी, पालिका असतानाही नवी गाडी विकत घेतली नहाी. सातत्याने कंत्राट देत राहिले. आज बीएसटीची दशा त्यांच्यामुळे झाली आहे,” असा आरोप त्यांनी केला.
फडणवीसांनी मदत कशी केली?
11 जून 2019 ला जो एमओयू झाला ज्यात 2007 मध्ये लागलेल्या कर्मचाऱ्यांचे 20 टक्के म्हणजे जवळपास सात, साडेसात हजारांनी वाढला. ते कर्मचारी त्यावेळी 14 हजारावर होते आणि आता 45 हजारांवर आले आहेत. त्यासाठी फडणवीस, शेलार यांनी त्यावेळीही मदत केली होती. कोविड आला तेव्हा बीएसटीच्या कर्मचाऱ्यांना भत्ता मिळत नव्हता. त्यावेळी आम्ही आंदोलन पुकारलं. पण देवेंद्र पडणवीस विरोधी पक्षनेते असतानाही त्यांनी तातडीने भूमिका मांडली आणि तीन चार दिवसात भत्ता लागू झाला. ग्रॅज्यूटीच्या वेळीही तातडीने मदत घेतली. महापालिका आयुक्तांशी बोलले. 12 तारखेला बीएसटीला 150 कोटी देण्यात आले. पण जी अवस्था शिवसेनेने बीएसटीची केली ती सुधारण्यासाठी फार काम आहे. देवेंद्र आणि आशिष शेलार मदत करतील अशी आशा आहे, असंही ते म्हणाले आहेत.