
दैनिक चालू वार्ता धाराशिव/ प्रतिनिधी -समीर मुल्ला
कळंब शहरासाठी पुढील पंचवीस वर्षे योग्य अशी पाणीपुरवठा योजनेची काम सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रारंभ होईल असे संजय मुंदडा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत घोषित केले आहे.
तत्कालीन नगराध्यक्ष संजय मुंदडा म्हणाली की ता.२२ जुलै २०२१ च्या त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत या योजनेचा ठराव मंजूर झाला होता.
या योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव बनवून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडे तांत्रिक मान्यतेसाठी सादर केला होता आमदार कैलास पाटील, तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे तत्कालीन खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व नंतरच्या काळातील पालकमंत्री तानाजी सावंत यांचे सहकार्याने तांत्रिक मान्यता मिळवली होती. परंतु मांजरा धरणातून उचला वयाच्या पाण्याची कळम शहरासाठी पाणी आरक्षण वाढवून घेणे हे काम कठीण होते, या कामी नगरपरिषदेतील कार्यकाळ संपलेला असतानाही मुंदडा यांनी प्रयत्नाची पराकाष्टा करून नगर परिषदेत तांत्रिक सल्लागार दिलीप साळुंखे यांच्या सहकार्याने पाणी आरक्षण जे १.४९ दलघमी आरक्षित होते ते २.३४ दलघमी पर्यंत वाढून घेतले यामुळेच प्रतिदिन ८९ लक्ष लिटर पाणी उचलता येणे शक्य झाले आहे.
तदनंतर या योजनेला नगर विकास विभागाची मंजुरी मिळविणे साठी शिवसेनेचे समन्वयक नितीन लांडगे यांच्या सहकार्याने तत्कालीन नगर विकास मंत्री व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथथान योजनेतून मंजूरी मिळवली.
सदर योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण केंद्रात एकावेळी 50 लाख लिटर पाणी शुद्ध करून सोडले जाईल एकूण 54 किलोमीटर पाईपलाईन केली जाणार आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात जवळ जुन्या फिल्टरवर ९.०६ लाख लिटर पाण्याची, कोर्टासमोर ६.९९ लाख लिटर पाण्याची तर पुनर्वसन सावरगाव हनुमान मंदिर येथे ६.१३ लाख लिटर पाण्याची नवीन टाक्या उभारल्या जातील या योजनेमध्ये सौर ऊर्जा तंत्राचा अंतर्भाव करून वीज बचत केली जाणार आहे. एकूण 68 कोटीच्या या योजनेच्या आरंभाने कळंब शहरातील दीर्घकाळाची परिपूर्ण पाणीपुरवठा योजना अमलात येईल असे संजय मुंदडानी यांनी सांगितले. यावेळी उबाठा गटाचे कळंब शिवसेना शहरप्रमुख विश्वजीत जाधव व सागर मुंडे उपस्थित होते