
दैनिक चालू वार्ता धाराशिव /प्रतिनिधी -समीर मुल्ला
आगामी काळात सुरू होत असलेल्या गणेशोत्सव दि . २७ पासून सुरू होत असून मुंबईकरांच्या सेवेसाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी कळंब आगारातून तब्बल 40 बस मागवल्या असल्याची माहिती रा .प .म मंडळाच्या प्रशासनाने दिल्या असुन दि . २३ रोजी कळंब आगारातून जवळपास २० बस गाड्या या मुंबईसाठी रवाना झाले आहेत . यामुळे कळंब आगारातून सुटणाऱ्या जवळपास २७ फेऱ्या रद्द झाल्यामुळे कळंब बस स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी झालेली आहे . कळंब आगारातून शेकडो प्रवासी ये जा करण्यासाठी नेहमीच बस स्थानकावर वर्दळ असते पण गणेशोत्सवाच्या काळात मात्र बसची संख्या पाहता प्रवाशांची मात्र चांगलीच हे ळसांड होत आहे अशातच कळंब बस आगारातून कळंब ते अक्कलकोट ,हुमनाबाद ,परळी, सोलापूर, उमरगा ,लोहारा ,जागजी ,कंणगरा, धाराशिव ,पुणे ,येडशी ,बार्शी, अहिल्यानगर ,नांदूर पुणे अशा विविध मार्गावरच्या जवळपास २७ बस गाड्या या २३ तारखेपासून बंद करण्यात आलेल्या आहेत यामुळे या मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे . या गैरसोयीबद्दल राप प्रशासनाने काहीतरी नियोजन करावे अशी मागणी प्रवाशातून जोर धरत आहे .