
मनोज जरांगेंचं आंदोलन मुंबईच्या वेशीवर आलंय..मात्र त्याआधीच मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोटो लावून जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी करण्यात आलीय.
हा बॅनर नीट पाहा.. इतिहास शिव्यांना नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवतो. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे आणि न्यायालयात टिकवून दाखवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. अशा आशयाचे बॅनर लागले आणि त्यावरुन नव्या वादाची ठिणगी पडलीय.मात्र या वादाची सुरुवात झाली ती मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरल्यानं याच वक्तव्यामुळे वाद पेटला आणि जरांगेंनी चूक लक्षात येताच यु-टर्न घेतला.. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जुनं वाक्य पुन्हा चर्चेत आलंय.
दुसरीकडे याच वाक्याचा धागा पकडत जरांगे मुंबईत पोहचण्याआधीच प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नरेंद्र पाटील आणि निरंजन डावखरेंनी बॅनरबाजी केलीय.तर जरांगेंच्या आंदोलनाची वेळ चुकली म्हणत निरंजन डावखरेंनी मराठा आरक्षणाचं श्रेय मुख्यमंत्र्यांना दिलंय. मनोज जरांगेंची रॅली मुंबईत येत असतानाच बॅनरबाजीतून जरांगेंना डिवचण्यात आलंय. त्यामुळे याच बॅनरबाजीमुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.